एक्स्प्लोर

सुधाकर बडगुजरांच्या पक्ष प्रवेशानं भाजप पवित्र झाली, एकनाथ खडसेंचा टोला, म्हणाले, माझ्या पक्षप्रवेशावेळी आक्षेप घेतले

नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांची भाजपवर मोठी टीका केली आहे.

Eknath Khadse : नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे नाशिक महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद वाढली आहे. सुधाकर बडगुजर यांची काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती, त्यानंतर आता त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांची भाजपवर मोठी टीका केली आहे. सुधाकर बडगुजर यांचे दाऊदचा जो हस्तक आहे सलीम कुत्ता त्याच्यासोबतचे डान्सचे फोटो प्रकाशित झाले होते. त्यामुळं भाजपने मोठा विरोध केला होता. पण आता सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं भाजप आता पवित्र झाल्याचा टोला एकनाथ खडसेंनी लगावला.

सुधाकर बडगुजर आणि घोलप यांच्या भाजप पक्षप्रवेशावरून खडसेंनी स्वतःच्या भाजप पक्षप्रवेशा संदर्भात वक्तव्य केलं आहे. सुधाकर बडगुजर यांचे दाऊद चा जो हस्तक आहे सलीम कुत्ता त्याच्यासोबत चे डान्स चे फोटो प्रकाशित झाले होते. त्यावेळी भाजपने मोठा विरोध केला होता. मात्र, आता सुधाकर बडगुजर यांचा  भाजपात प्रवेश झाला आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टी ही पवित्र झाली आहे. एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये प्रवेश देताना आक्षेप आहे म्हणून नाथाभाऊंना प्रवेश दिला गेला नाही. तेव्हा भाजप अपवित्र होत होता असेही एकनाथ खडसे म्हणाले.

कोण आहेत सुधाकर बडगुजर?

सुधाकर बडगुजर हे संजय राऊत यांचे विश्वासू मानले जातात. त्यांच्या राजकीय कारकीर्दीला 2007 मध्ये सुरुवात झाली. ते नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यावेळी बडगुजर यांनी शिवसेनाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर 2008 साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2009 ते 2012 काळात ते नाशिक महापालिकेचे सभागृहनेते होते. तसेच 2012 ते 2015 या काळात बडगुजर हे महापालिकेचे विरोधी पक्षनेते होते. 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणूकीत त्यांचा नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला. त्यानंतर त्यांची उपनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अनेक गुन्हेगारी घटनांमध्येही बडगुजर यांच्यावर आरोप आहे. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मी समाजासाठी झटतो, समाजाची सेवा करतो. कोरोना काळात मी अनेक रक्तदान शिबीरे घेतली. कोणी बाहेर येत नव्हते त्यावेळी मी कोविड सेंटर सुरु केलं. पक्षासाठी काम केलं. परंतू नियतीने घाला घातला आणि माझ्यावर कारवाई केली. ज्या पक्षाने माझा अनादर केला, त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असे सुधाकर बडगुजर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Mumbai Auto Taxi Rate Hike Marathi News: 1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार; मुंबई, ठाणेसह कुठेकुठे भाडे वाढणार?, A टू Z माहिती
1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार; मुंबई, ठाणेसह कुठेकुठे भाडे वाढणार?, A टू Z माहिती
Embed widget