Nana Patole : आण्णा हजारेंना आंदोलन करण्यापासून थांबवलं, पण आता महाजनांच्या मध्यस्तीनंतर आंदोलनं अधिक पेटली: नाना पटोले
Maratha Reservation : भाजपचे संकटमोचक म्हणून गिरीश महाजनांनी अनेक आंदोलनं थांबवली, पण आता त्यांच्या मध्यस्तीमुळे मराठा आंदोलन अधिक पेटल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
![Nana Patole : आण्णा हजारेंना आंदोलन करण्यापासून थांबवलं, पण आता महाजनांच्या मध्यस्तीनंतर आंदोलनं अधिक पेटली: नाना पटोले congress nana patole on bjp girish mahajan maratha reservation manjoj jarange protest jalgaon update Nana Patole : आण्णा हजारेंना आंदोलन करण्यापासून थांबवलं, पण आता महाजनांच्या मध्यस्तीनंतर आंदोलनं अधिक पेटली: नाना पटोले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/10/a6419631531feb551a13c4424f435c661662794290609381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जळगाव: आण्णा हजारे यांना आंदोलन करण्यापासून थांबवणाऱ्या भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची जादू आता चालत नसून त्यांच्या मध्यस्थीने आंदोलने अधिक तीव्र होऊ लागले असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली. देवेंद्र फडणीस यांची क्लिप डीलीट केल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने तातडीने प्रतिक्रिया दिली त्याच पद्धतीने त्यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नावरही प्रतिक्रिया द्यायला हवी होती असंही ते म्हणाले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, कोणत्याही अडचणीच्या काळात भाजपने मंत्री गिरीश महाजन यांचा मध्यस्थीसाठी उपयोग करून घेतला आहे. आण्णा हजारे यांना समजावण्यात देखील गिरीश महाजन याना यश मिळाले होते, त्यामुळे संकट मोचक म्हणून त्यांची ओळख होती. आता मात्र भाजप चांगलाच अडचणीत असताना गिरीश महाजन यांची जादू आता चालत नसल्याचं दिसून येतंय. त्यांच्या मध्यस्थीने आंदोलने अधिक तीव्र होताना दिसत आहेत.
नाना पटोले म्हणाले की, देवेंद्र फडणीस यांची क्लीप डीलीट केल्या नंतर त्यांनी ज्या पद्धतीने तातडीने प्रतिक्रिया दिली त्याच पद्धतीने त्यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर ही प्रतिक्रिया द्यावी. आत्महत्या, महागाई,बेरोजगारी यावर बोलावे. दहा वर्षे आरक्षण का दिले नाही त्यावर भाजपाने उत्तर द्यावे असंही ते म्हणाले.
भाजपाला आरक्षण संपुष्ठात आणायचं आहे
नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणना मांडली ती महत्त्वाची आहे. या जातनिहाय जनगणनेतून सर्व प्रश्न सुटू शकतात. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरीब एक जात आणि श्रीमंत एक जात अस सांगत विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. याचाच अर्थ भाजपाला आरक्षण संपुष्ठात आणायचं आहे हे यातून दिसत आहे. भाजपने या विषयावर आपली स्पष्टता दिली दिली पाहिजे आणि आरक्षणाचा प्रश्न सोडविला पाहिजे. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, दुष्काळ आहे, हे सरकार जीवघेणे आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात देशात महागाई, बेरोजगारी असून या प्रश्नाकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील लोकसभेची जागा एकनाथ खडसे लढतील अस जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे. मात्र आज या विषयावर बोलण्यापेक्षा आमच्या दृष्टीने भाजपाला सत्तेपासून दूर करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, या विषयावर योग्य वेळी निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)