एक्स्प्लोर

एकनाथ खडसेंकडून भाजप प्रवेशाची घोषणा, कट्टर विरोधक चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...

Chandrakant Patil on Eknath Khadse : एकनाथ खडसे हे येत्या 15 दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर खडसेंचे कट्टर विरोधक चंद्रकांत पाटलांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Chandrakant Patil on Eknath Khadse : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे येत्या 15 दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज जळगावमध्ये (Jalgaon) त्यांनी भाजप प्रवेशावर वक्तव्य केले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे राजकीय कट्टर विरोधक राहिलेल्या आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जाणार असल्याचं ते सांगत असले तरी त्यात संभ्रम आहे. त्यामुळे त्यांचा प्रवेश होत नाही तोपर्यंत प्रतिक्रिया देणे उचित होणार नाही. एकनाथ खडसे हे सक्षम नेते आहेत. राज्यातील सगळ्या जागा निवडून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असेल. त्यांचे स्वागत नाही केले नाही तरी ते चांगले काम करतील, असा मला विश्वास आहे. खडसे हे स्टार प्रचारक आहेत आणि आता भाजपमध्ये (BJP) स्टार प्रचारक होतील, असे त्यांनी म्हटले आहे.

लोकसभेच्या सगळ्या जागा जिंकण्यासाठी खडसेंचा उपयोग होणार

खडसे यांचा आणि आपला तात्विक विरोध राहिला आहे. तो काही शेतीच्या बांधावरचा वाद नव्हता. वैयक्तिक विरोध नव्हता त्यामुळे परिस्थितीनुसार निर्णय घेता येईल. राज्यात लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) सगळ्या जागा जिंकण्यासाठी खडसे यांचा उपयोग होणार आहे. मी मागील काळात बरेच भोगले होते. मात्र, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या काळात त्यांनी साथ दिल्याने कामाचं समाधान होत आहे. त्यांची अशीच साथ कायम राहील, अशी आपल्याला आशा आहे. 

रक्षा खडसेंचा प्रचार करण्याची आवश्यकता असेल तर...

रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी त्यांच्या मतदारसंघात जे काही काम केले आहे. त्यामुळे या मतदार संघात त्यांना अडचण नाही. मी काम केले नाही तरी चालणार आहे. मात्र महायुतीचा घटक असल्याने प्रचार करण्याची आवश्यकता असेल तर नक्कीच करणार असल्याची प्रतिक्रिया खडसे परिवाराचे राजकीय विरोधक राहिलेले आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

रोहिणी खडसे शरद पवारांच्या भेटीला

दरम्यान, रावेर लोकसभा मतदारसंघासाठी रक्षा खडसे यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून अद्याप उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर उद्या रोहिणी खडसे शरद पवारांची पुण्यात भेट घेणार आहे. रावेर लोकसभा मतदारसंघाबाबत उद्या बैठक आयोजित करण्यात आली असून शरद पवार गटाकडून रक्षा खडसेंविरोधात कोणाला उमेदवारी मिळणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.  

आणखी वाचा

Blog : रोहिणी खडसेंचा एक निर्णय आणि थेट भाजपलाच धोबीपछाड

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh case : त्यामुळे धनंजय मुंडे दोषी असल्यासारखा संभ्रम निर्माण झाला आहे; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंकडून पहिल्यांदाच थेट भूमिका!
त्यामुळे धनंजय मुंडे दोषी असल्यासारखा संभ्रम निर्माण झाला आहे; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंकडून पहिल्यांदाच थेट भूमिका!
Shirdi Crime : शिर्डीत दोन गटात राडा, गावकरी घटनास्थळी पोहोचताच युवकांनी चारचाकी सोडून काढला पळ, गाडीत धारदार शस्त्र आढळल्याने खळबळ
शिर्डीत दोन गटात राडा, गावकरी घटनास्थळी पोहोचताच युवकांनी चारचाकी सोडून काढला पळ, गाडीत धारदार शस्त्र आढळल्याने खळबळ
भयंकर! वाघांच्या शिकारीचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन; म्यानमारमार्गे गेल्या 4 महिन्यात भारतातून किमान 15 वाघांची चीनमध्ये तस्करी
भयंकर! वाघांच्या शिकारीचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन; म्यानमारमार्गे गेल्या 4 महिन्यात भारतातून किमान 15 वाघांची चीनमध्ये तस्करी
Santosh Deshmukh : कृष्णा आंधळे फक्त कागदोपत्री फरार, पोलीस हेच खरे गुन्हेगार, पोलिसांवर आता आमचा विश्वास नाही; मस्साजोग गावकऱ्यांकडून 'पोलिसी' कारभाराची चिरफाड
कृष्णा आंधळे फक्त कागदोपत्री फरार, पोलीस हेच खरे गुन्हेगार, पोलिसांवर आता आमचा विश्वास नाही; मस्साजोग गावकऱ्यांकडून 'पोलिसी' कारभाराची चिरफाड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh PC : पोलीस यंत्रणेनं चुका केल्यानेच खून झाला, सर्व आरोपी हे पोलिसांचे मित्रचDr Tara Bhavalkar: 10वी पर्यंतच शिक्षण मराठीतच हवं,मराठी साहित्य संमेलनाध्यक्षा तारा भवाळकरांचं भाषणABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 22 February 2025Nitesh Rane : ठाकरेंच्या शिवसेनेवर थेट 'प्रहार'राणे म्हणातात..कर्जाची परतफेड व्याजासह

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh case : त्यामुळे धनंजय मुंडे दोषी असल्यासारखा संभ्रम निर्माण झाला आहे; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंकडून पहिल्यांदाच थेट भूमिका!
त्यामुळे धनंजय मुंडे दोषी असल्यासारखा संभ्रम निर्माण झाला आहे; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंकडून पहिल्यांदाच थेट भूमिका!
Shirdi Crime : शिर्डीत दोन गटात राडा, गावकरी घटनास्थळी पोहोचताच युवकांनी चारचाकी सोडून काढला पळ, गाडीत धारदार शस्त्र आढळल्याने खळबळ
शिर्डीत दोन गटात राडा, गावकरी घटनास्थळी पोहोचताच युवकांनी चारचाकी सोडून काढला पळ, गाडीत धारदार शस्त्र आढळल्याने खळबळ
भयंकर! वाघांच्या शिकारीचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन; म्यानमारमार्गे गेल्या 4 महिन्यात भारतातून किमान 15 वाघांची चीनमध्ये तस्करी
भयंकर! वाघांच्या शिकारीचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन; म्यानमारमार्गे गेल्या 4 महिन्यात भारतातून किमान 15 वाघांची चीनमध्ये तस्करी
Santosh Deshmukh : कृष्णा आंधळे फक्त कागदोपत्री फरार, पोलीस हेच खरे गुन्हेगार, पोलिसांवर आता आमचा विश्वास नाही; मस्साजोग गावकऱ्यांकडून 'पोलिसी' कारभाराची चिरफाड
कृष्णा आंधळे फक्त कागदोपत्री फरार, पोलीस हेच खरे गुन्हेगार, पोलिसांवर आता आमचा विश्वास नाही; मस्साजोग गावकऱ्यांकडून 'पोलिसी' कारभाराची चिरफाड
Supreme Court : सासरची क्रूरता सिद्ध करण्यासाठी हुंड्याच्या आरोपाची गरज नाही; सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा निर्णय फिरवला
सासरची क्रूरता सिद्ध करण्यासाठी हुंड्याच्या आरोपाची गरज नाही; सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा निर्णय फिरवला
Share Market :  सेन्सेक्स निफ्टी आठ महिन्यांच्या निचांकी पातळीवर, स्मॉल कॅप मिड कॅपची तेजी ओसरली, शेअर बाजारात काय काय घडलं?
सेन्सेक्स, निफ्टी 8 महिन्यांच्या निचांकी पातळीवर, डोनाल्ड ट्रम्प अन् FPI च्या निर्णयानं जोरदार फटका, बाजारात काय घडला?
RBI : आरबीआयचा एका बँकेसह दोन फायनान्स कंपन्यांना दणका, सिटी बँकेला 39 लाखांचा दंड
आरबीआयचा एका बँकेसह दोन फायनान्स कंपन्यांना दणका, सिटी बँकेला 39 लाखांचा दंड
SSC Exam Paper Leak : दहावीच्या पेपर फुटी प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी ठोकल्या तीन जणांना बेड्या
दहावीच्या पेपर फुटी प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी ठोकल्या तीन जणांना बेड्या
Embed widget