एक्स्प्लोर

Marathi Sahitya Sammelan : 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप; 'या' नेत्यांची उपस्थिती लाभणार

Jalgaon News : 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप होणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार होते. मात्र वैद्यकीय कारणास्तव ते उपस्थित राहणार नाहीत.

Marathi Sahitya Sammelan : 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास (97th Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan) शुक्रवारपासून जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) येथील सानेगुरुजी नगरी येथे सुरुवात झाली. साहित्य संमेलनाचा शुभारंभ सुमित्रा महाजन (Sumitra Mahajan) यांच्या हस्ते करण्यात आला. संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र शोभणे (Dr. Ravindra Shobhane) हे आहेत. आज रविवारी राठी साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे. 

या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय कारणास्तव ते येऊ शकणार नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून कळविण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. तसेच, या समारोप कार्यक्रमासाठी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, काही अपरिहार्य कारणामुळे गडकरीही येऊ शकणार नसल्याचे समजते. समारोप कार्यक्रमास विधान परिषदेच्या सभापती नीलम गोन्हे आणि राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती मिळत आहे. 

लोककला, लोकसंगीत कार्यक्रमात महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन

बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृहात लोककला, लोकसंगीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. कलावंतांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवत उपस्थितांची मने जिंकली. नगरदेवळा येथील खान्देश शाहीर शिवाजीराव पाटील यांनी सादर केलेल्या पोवड्याने उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले. बापूसाहेब हटकर यांनी कर्ण जल्मानी कहाणी सादर केली. विनोद ढगे यांनी वही गायन सादर केले. प्रविण पवार यांनी केलेल्या संबंळ नृत्याने सभागृह उत्सहाने भरुन गेले होते. खान्देशी पोवडा म्हणून प्रसिद्ध असलेला टिंगरीवाला भिका भराडी यांनी जोशात सादर केली. 

खान्देशी लोकगीतात वसुंधरा यांनी हळद कूटन कूटा वं कूटा वं खांड..., पायतं, तेलन, पोखान, खेसर, देव वरन म्हणजेच देव नाचवणं व आखाजी नं गीत आथानी कैरी तथानी कैरी व गौराई गीत गायली. यावर मृणाल धनगर यांनी नृत्य सादर केले. यासोबतच जागरण, गोंधळ, गोंधय धोंडी गीत परशुराम सुर्यवंशी यांनी सादर केली. वन्हे विकास राजपूत यांनी सादर केले. शेषराव गोपाळ व सुनंदा कोचुरे यांनी तामाशातील गण व गवळण सादर करुन रंगत आणली. 

इतर महत्वाच्या बातम्या

Tehsildars Transfers : मराठवाड्यातील 27 तहसीलदारांच्या बदल्या, पाहा कोणाची कुठे झाली बदली?

Marathi Serials : जुई गडकरीच्या 'ठरलं तर मग' मालिकेची TRP मध्ये जबरदस्त कामगिरी; अरुंधतीची 'आई कुठे काय करते' पडली मागे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
Kunal Kamra : पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5PM 26 March 2025Ajit Pawar Vidhan Sabha Speech | गुलाबरावांनी पान टपरीवर काम केलं, झिरवाळांनी मजुरी केली..अजित पवारांचं दणदणीत भाषणABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4PM 26 March 2025Eknath Shinde Vidhan Parishad Speech | कार्यकर्त्यांनो पेटवा मशाल आम्ही बंगल्यात झोपतो खुशाल, ठाकरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
Kunal Kamra : पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
Eknath Shinde : मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
ATM Fee Hike : एटीएममधून पैसे काढणं 1 मे पासून महागणार, इंटरचेंज शुल्कामध्ये वाढ, जाणून घ्या बदल
ATM Fee Hike : एटीएममधून पैसे काढणं 1 मे पासून महागणार, इंटरचेंज शुल्कामध्ये वाढ, जाणून घ्या बदल
मोठी बातमी! कुणाल कामरा अन् सुषमा अंधारेंविरुद्ध विधिमंडळात हक्कभंग दाखल; शिवसेना नेत्याची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! कुणाल कामरा अन् सुषमा अंधारेंविरुद्ध विधिमंडळात हक्कभंग दाखल; शिवसेना नेत्याची पहिली प्रतिक्रिया
Embed widget