गुंतवणूकदारांनो राहा तयार! सप्टेंबर महिन्यात तब्बल 12 आयपीओ येणार, पैसे कमवण्याची हीच ती वेळ!
सप्टेंबर महिन्यात पैसे कमवण्याची चांगली संधी आहे. कारण या महिन्यात एकूण 12 आयपीओ येणार आहेत. त्यामुळे आतापासूनच खिशात पैसे तयार ठेवायला हवेत.
मुंबई : शेअर बाजाराचा पुढचा आठवडा 9 सप्टेंबरपासून चालू होणार आहे. आगामी काळात शेअर बाजारात मोठे चढउतार पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात गुंतवणूकदारांना पैसे कमवण्याची मोठी संधी असणार आहे. कारण सप्टेंबर महिन्यात एकूण 12 वेगवेगळ्या कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. या सर्व आयपीओंची एकूण किंमत 100 कोटी डॉलर्स म्हणजेच 8600 कोटी रुपये आहे. या 12 आयपीओंपैकी चार आयपीओ हे मेनबोर्ड आयपीओ असतील. या चारही आयपीओंचे शेअर बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होतील. तर उर्वरीत आठ आयपीओ हे स्मॉल अँड मीडियम इंटरप्रायझेस (एसएमई) सेगमेंटमधील आहेत. याच महिन्यात आणखी काही कंपन्यांचे आयपीओ येण्याची शक्यता आहे. मात्र हे आयपीओ नेमके कधी येणार हे अद्याप स्पष्ट नाही.
मेनबोर्ड सेगमेंटमध्ये कोणते आयपीओ येणार?
एकूण चार कंपन्यांचे मेनबोर्ड आयपीओ सोबतच येणार आहेत. यामध्ये बजाज हाऊसिंग फायानान्स या कंपनीचा आयपीओ हा 6560 कोटी रुपयांचा असेल. त्यानंतर टॉलिंस टायर्स हा आयपीओ 230 कोटी, क्रॉस हा आयपीओ 500 कोटी रपयांचा तर पीएन गाडगीळ ज्वेलर्स हा आयपीओ 1100 कोटी रुपयांचा असेल. या व्यतिरिक्त वेस्टर्न कॅरियर्स इंडिया या कंपनीचाही आयपीओ येणार आहे. मात्र त्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.
बजाज हाउसिंग फायनान्स, टॉलिंस टायर्स आणि क्रॉस हे तीन आयपीओ 9 सप्टेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुले होतील. 11 सप्टेंबरपर्यंत या आयपीओंत गुंतवणूक करता येणार आहे. पीएन गाडगीळ ज्वेलर्स हा आईपीओ 10 सप्टेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होईल. या आयपीओत 12 सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करता येईल.
ग्रे मार्केटची स्थिती काय?
ग्रे मार्केटमध्ये या आयपीओंच्या शेअर्साचा प्रिमियम (GMP) वाढत आहे.. बजाज हाउसिंग फायनान्सचा शेअर 70 रुपये या आयपीओच्या अपर प्राईस बँडच्या 51 रुपए म्हणजेच 73% जीएमपी वर आहे. तर टॉलिंस टायर्स 12% आणि पीएन गाडगीळ ज्वेलर्स 73% जीपीएमवर आहेत.
SME सेगमेंटमध्ये कोणते आयपीओ येणार?
एसएमई सेगमेंटमधील आयपीओबद्दल बोलायचं झालं तर गजानंद इंटरनॅशनल, शेअर समाधान, शुभश्री बायोफ्यूल्स एनर्जी आणि आदित्य अल्ट्रा स्टील हे चार आयपीओ 9 सप्टेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुले होतील. 11 सप्टेंबरपर्यंत या आयपीओंत गुंतवणूक करता येईल. ट्रॅफिकसोल ITS टेक्नोलॉजीज आणि एसपीपी पॉलीमर हे दोन आयपीओ 10 सप्टेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुले होतील. 13 सप्टेंबरपर्यंत या आयपीओंत गुंतवणूक करता येईल. याशिवाय इनोमेट अॅडव्हांस्ड मटेरियल्स आणि एक्सलंट वायर्स अँड पॅकेजिंग हे आयपीओ 11 ते 13 सितंबर या कालावधीत गुंतवणुकीसाठी खुले होतील. या सर्व कंपन्यांच्या आयपीओंचे मूल्य हे 12 ते 45 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
झोमॅटो शेअर पाडणार पैशांचा पाऊस, भविष्यात देणार जबरदस्त रिटर्न्स; स्टॉपलॉस अन् टार्गेट काय?