एक्स्प्लोर

आता डेटवर जाण्यासाठी थेट पगारी सुटी, कंपनीच्या नव्या निर्णयाची जगभर चर्चा; ''टिंडर लिव्ह' धोरण आहे तरी काय?

सध्या एका कंपनीच्या आगळ्यावेगळ्या धोरणाची जगभरात चर्चा होत आहे. ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना डेटवर जाण्यासाठी चक्क पगारी सुटी देत आहे.

मुंबई : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना स्वत:ला वेळ देणं शक्य होत नाही. अनेकजण ऑफिसच्या कामात एवढे व्यग्र झालेले असतात की त्यांना खासगी आयुष्यासाठी वेळच शिल्लक राहात नाही. कर्मचाऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन आता एका कंपनीने थेट डेटसाठी पगारी सुटी देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या दिवशी डेटवर जायचे आहे, त्या दिवशी कर्मचाऱ्यांना कंपनीकडून रितसर सुटी दिली जाणार आहे. कंपनीच्या या निर्णयाची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. 

आता डेटवर जाण्यासाठी मिळणार पगारी सुटी

वेगवेगळ्या खासगी कंपन्यांत काम करणारे कर्मचारी वैयक्तिक कामांसाठी वेळ मिळत नसल्यामुळे त्रस्त असतात. कामाचा ताण आणि घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळताना कर्मचाऱ्यांची चांगलीच परवड होते. त्यामुळे हेच वर्क प्रेशर कमी व्हावे यासाठी या कंपनीने टेडिंगवर जाण्यासाठी पेड लिव्ह देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या निर्णयाची सध्या जगभर चर्चा होत आहे. ही कंपनी मूळची थायलँडची आहे. या कंपनीचे नाव व्हाईटलाईन ग्रुप आहे. ही कंपनी मार्केटिंगचे काम करते. कंपनीच्या या अनोख्या निर्णयाबाबत स्ट्रेट टाईम्स या वृत्तसंकेतस्थळाने वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार या कंपनीचा एखादा कर्मचारी डेटवर जाण्यासाठी रितसर पगारी रजा घेऊ शकतो. कर्मचारी आपल्या जोडीदारासोबत ज्या दिवशी डेटवर जाईल, त्या दिवशी त्याला पूर्ण पगार मिळणार आहे. 

टिंडर गोल्ड आणि प्लॅटिनमसाठी कंपनी पैसे देणार 

कंपनीने डेटवर जाण्यासाठी सुटी देताना विशेष धोरण तयार केलं आहे. कंपनीने या सुटीला टिंडर लिव्ह असं नाव दिलंय. याला काहीजण डेटिंग लिव्ह असंही म्हणत आहेत. या सुटीच्या धोरणाअंतर्गत ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना टिंडर गोल्ड आणि टिंडर प्लॅटिनम सब्सक्रिप्शन देणार आहे. या पगारी सुटीची ऑफर कंपनीने आपल्या सर्वच कर्मचाऱ्यांना दिली आहे. मात्र वर्षभरात किती टिंडर लिव्ह मिळणार, हे कंपनीने स्पष्ट केलेले नाही. 

टिंडर लिव्हचा फायदा नेमकं कोण घेऊ शकणार?

व्हाईटलाईन ग्रुपच्या टिंडर लिव्हची सुरुवात या वर्षाच्या जुलै महिन्यापासून झालेली आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत रुजू होणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांसाठी ही टिंडर लिव्ह लागू असेल. या पगारी सुटीबाबत कंपनीने त्यांच्या लिंक्डईनच्या अधिकृत खात्यावरही माहिती दिलेली आहे. आमचे कर्मचारी टेडिंगवर जाताना टिंडर लिव्ह घेऊ शकतात, असं यात नमूद आहे.

कर्मचाऱ्यांच्या कामात सुधारणा व्हावी म्हणून निर्णय 

आपल्या कर्मचाऱ्यांचे हीत लक्षात घेऊन या कंपनीने टिंडर लिव्ह देण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय. प्रेमात पडल्यानंतर कर्मचारी आनंदी राहतो.  याचा परिणाम ऑफिसमधील कामावर होतो. काम चांगले होते, अशी कंपनीची धारणा आहे. कंपनीच्या पॉलिसीनुसार 9 जुलैपासून ते 31 डिसेंबरपर्यंत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना या सुटीचा लाभ मिळणार आहे. या कंपनीकडे साधारण 200 कर्मचारी आहेत.  

हेही वाचा :

IPO येण्याआधीच आमिर खान, रणबीर कपूरने केली कोट्यवधीची गुंतवणूक, 'ही' कंपनी पाडणार पैशांचा पाऊस, पैसे ठेवा तयार!

फक्त 'या' दोन शेअर्समध्ये करा गुंतवणूक, पडेल पैशांचा पाऊस!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad Podcast : समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
Good News : भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल

व्हिडीओ

Ashish Shelar PC : ठाकरे बंधू मराठी माणसासाठी नाही, सत्तेसाठी एकत्र, आशिष शेलार यांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : ठाकरेंच्या युतीची टिंगल उडवली, म्हणाले, मला वाटलं झेलेन्स्की अन् पुतीनच एकत्र आले
Thackeray Brohters Yuti : शिवसेना-मनसे युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, राज ठाकरेंची घोषणा
Raj Thackeray Uddhav Thackeray Yuti Full PC :शिवसेना-मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, ठाकरेंची घोषणा
Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad Podcast : समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
Good News : भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
Shivsena : गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Nashik : नाशिकचा तिढा सुटला! भाजपचा 25 ते 30 जागांचा प्रस्ताव शिंदेंच्या शिवसेनेला मान्य, सूत्रांची माहिती
नाशिकचा तिढा सुटला! भाजपचा 25 ते 30 जागांचा प्रस्ताव शिंदेंच्या शिवसेनेला मान्य, सूत्रांची माहिती
Embed widget