Special Report Satish Bhosale House : 'खोक्या'च्या घरावर घाई, सुरेश धसांना वाटतेय घाई!
Special Report Satish Bhosale House : 'खोक्या'च्या घरावर घाई, सुरेश धसांना वाटतेय घाई!
भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या...पोलिसांना गुंगारा देणारा हा खोक्या अखेर जेरबंद झाला...आणि त्याच्या घरावर बुलडोझरही चालला...आता त्यावरूनच राजकारण पेटलंय...वनविभागाच्या या कारवाईवर अनेकांनी आक्षेप घेतलाय...त्यात आघाडीवर आहेत सुरेश धस...पाहुयात नेमकं प्रकरण काय आहे ते...लोकांना मारहाण करणारा... पैशांची मस्ती दाखवणारा खोक्या... जेरबंद झाला... इतके वर्ष गप्प असलेल्या वनविभागानंही खोक्याच्या घरावर बुलडोझर चालवला... त्यानंतर काही जणांनी त्याच्या घराची जाळपोळ केली... दुसरीकडे पोलिसांनी खोक्याला शिरूर कासारमधल्या बावी गावात घेऊन गेले... इथल्याच खोक्यानं ढाकणे पितापुत्रांना बेदम मारहाण केली होती... खोक्या हा भाजपचे आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता... त्याच धसांना खोक्याचा पुळका आलाय का असा प्रश्न पडावा... कारण त्यांनी वनविभागाच्या कार्यतत्परतेला अतिघाई म्हटलंय...
All Shows































