एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रस्त्यावरील नमाज रोखू शकत नाही, तर जन्माष्टमीही रोखण्याचा अधिकार नाही: योगी
जर मी ईदला रस्त्यावरील नमाज बंद करु शकत नाही, तर मला पोलीस स्टेशनमधील जन्माष्टमी रोखण्याचा अधिकार नाही, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.
लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धार्मिक स्थळांवरील लाऊड स्पीकरबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
जर मी ईदला रस्त्यावरील नमाज बंद करु शकत नाही, तर मला पोलीस स्टेशनमधील जन्माष्टमी रोखण्याचा अधिकार नाही, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.
इतकंच नाही तर कावड यात्रेतील लाऊडस्पीकरला बंदी घालायची असेल, तर सर्वधर्मांसाठी ते लागू करावं लागेल, असंही योगींनी ठणकावून सांगितलं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘केशव संवाद पत्रिका’ या विशेषांकाचा लोकार्पण सोहळा योगींच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी योगींनी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
“जर रस्त्यावरील ईदची नमाज रोखू शकत नाही, तर पोलीस स्थानकातील श्रीकृष्ण जन्माष्टमीही रोखण्याचा अधिकार नाही”, असं योगींनी नमूद केलं.
योगी म्हणाले, “कावड यात्रेदरम्यान माईक किंवा लाऊडस्पीकर वाजवू नये, असं मला सांगण्यात आल्याने मी आश्चर्यचकीत झालो. त्यावेळी मी म्हणालो, ही कावड यात्रा आहे की शव यात्रा आहे? जर कावड यात्रेत ढोल, नगारे, डमरु वाजणार नाहीत, लोक नाचणार-गाणार नाहीत, तर ती कावड यात्रा कशी? यूपीत कावड यात्रेदरम्यान लाऊडस्पीकर वाजवण्यास कोणतीही बंदी नसेल. मी आदेश देतो की कावड यात्रेदरम्यान हेलीकॉप्टरने पुष्पवृष्टी करा”
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement