Yes Bank Scam: येस बँकेच्या राणा कपूर यांना जामीन मंजूर, 466 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप
Rana Kapoor: आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांनी राणा कपूर यांना पीएमएलए (PMLA) कायद्यांतर्गत अटक केली होती.
![Yes Bank Scam: येस बँकेच्या राणा कपूर यांना जामीन मंजूर, 466 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप Yes Bank co founder Rana Kapoor granted bail by Delhi High Court in money laundering case Marathi News Yes Bank Scam: येस बँकेच्या राणा कपूर यांना जामीन मंजूर, 466 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/25/56803a0ed62ec078b523eb8daae5a2b3166936487642393_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर (Rana Kapoor) यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ईडीने 466.51 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात त्यांना अटक केली होती. राणा कपूर यांना पीएमएलए कायद्यांतर्गत ही अटक करण्यात आली होती. आता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. या आधी राणा कपूर यांना दिल्लीतील एका मालमत्तेच्या विक्रीसंबंधित फसवणुकीच्या प्रकरणात सशर्त जामीन मंजूर झाला होता. आता आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जामीन मंजूर झाल्यामुळे तुरुंगातून बाहेर येण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
येस बँकेशी संबंधित घोटाळ्यामुळे बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर यांना अटक करण्यात आली होती. त्यांनंतर त्यांच्या पत्नी बिंदूसह दोन मुली रोशनी आणि राधा यांनाही अटक करण्यात आली होती. या प्रकरणी सीबीआयने राणा कपूर आणि अवंता ग्रुपचे प्रमोटर गौतम थापर यांच्यावर 466.51 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी आरोपपत्र दाखल केलं होतं.
आर्थिक अनियमितता आणि बेहिशेबी कर्जवाटपामुळे रिझर्व्ह बँकेनं येस बँकेवर निर्बंध लागू केले होते. मात्र त्यानंतर टप्याटप्याने ते शिथिल करण्यात आले आणि येस बँकेचे व्यवहार पूर्ववत केले.
काय आरोप आहेत?
राणा कपूर हे येस बँकेचे सीईओ असताना सुमारे 30 हजार कोटी रुपयांचं कर्जवाटप झालं होतं. यापैकी 20 हजार कोटी रुपयांची कर्ज बोगस असल्याचा दावा तपासयंत्रणेने केला आहे. त्याचबरोबर त्यानं सुमारे 202.10 कोटी रुपयांची कर्ज काही दिवाळखोरी जाहीर केलेल्या कंपन्यांसाठी मंजूर केल्याचेही उघड झाले आहे. मध्ये एचडीआयएल कंपनीचाही सहभाग आहे.
डीएचएफएलचे कपिल वधवान आणि धिरज वधवान यांच्या विरोधात सीबीआयने सरकारचे अनुदान लाटल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. या लोकांनी मुंबईतील बांद्रा येथे एक डीएचएफएलची एक खोटी शाखा उघडली आणि त्यामाध्यमातून 14,046 कोटी रुपयांची पंतप्रधान आवास योजनेचे खोटी कर्ज खाती तयार केली. ज्यांच्या नावावे खाती काढण्यात आली होती त्या ग्राहकांनी आपले कर्ज आधीच भरले होते. या खात्यांना डेटाबेसमध्ये टाकण्यात आलं.
कपिल वधवान आणि धिरज वधवान हे दोघे येस बँक घोटाळ्याच्या संबंधित मनी लॉन्ड्रिगच्या आरोपाखाली आधीपासूनच तुरुंगात आहेत. आता पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून 1,887 कोटी रुपयांचे अनुदान लाटण्यासाठी त्यांनी खोटी खाती तयार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)