एक्स्प्लोर

Divorced Photoshoot: भारतात नव्या विचारांची सुरुवात, प्री वेडिंग किंवा पोस्ट वेडिंग नाही तर घटस्फोटाचे फोटोशूट

Divorced Photoshoot: भारतात घटस्फोटानंतर महिला या मानसिकदृष्ट्या खचल्या जातात. परंतु या महिलेने याच रुढी परंपरांना मागे सारत नव्या विचारांची सुरुवात केली आहे.

Divorced Photoshoot: लोकं आपल्या लग्नाचं प्री वेडिंग फोटोशूट(Pre wedding) फार हौसेने हल्ली करतात. प्री वेडिंग नंतर पोस्ट वेडिंग(Post Wedding) त्यानंतर प्री बेबी फोटोशूट हे सगळे प्रकार अगदी आनंदाने लोकं करतात. पण तुम्ही कधी घटस्फोटाचे फोटोशूट(Divorce Photoshoot) पाहिले आहे का? चेन्नईत राहणाऱ्या एका महिलेने आपल्या घटस्फोटाचे फोटोशूट केले आहे. आपल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर त्याचं दु:ख करत बसण्यापेक्षा या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहून हटके अंदाजात या महिलेने घटस्फोटाचे फोटोशूट केले. 

शालिनीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन तिच्या घटस्फोटाच्या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत, शालिनीने तिच्या हातात 'DIVORCED' अक्षरे हायलाइट करत फोटो काढले आहेत. दुसऱ्या फोटोत  शालिनी स्वतःचा आणि पतीचा एकत्र फोटो फाडताना दिसत आहे. याशिवाय तिसर्‍या फोटोत शालिनी तिची आणि तिच्या पतीची फोटो फ्रेम पायाने चिरडताना दिसत आहे.

नव्या विचारांची सुरुवात 

घटस्फोटानंतर भारतीय स्त्रिया भावनिकदृष्ट्या तुटतात आणि नैराश्यात जातात. पतीपासून विभक्त झाल्यानंतर तिला सामान्य जीवनात परत येण्यासाठी थोडा वेळ लागतो. पण ही जुनी विचारसरणी मोडीत काढण्यासाठी शालिनीने पुढाकार घेतला आहे.

शालिनीच्या एका फोटोत ती हातात बोर्ड घेऊन उभी आहे, ज्यावर लिहिले आहे, 'माझ्या आयुष्यात 99 समस्या आल्या पण एक नवरा आला नाही. '. हे फोटो आयरिस फोटोग्राफीने , 'भारतात पहिल्यांदाच काहीतरी अनोखे! एक 'घटस्फोट सेलिब्रेशन फोटोशूट' प्रत्येक शेवट एक नवीन सुरुवात करतो.जर तुम्हालाही अशी उंच झेप घ्यायची असेल तर ज्या गोष्टी तुम्हांला मागे खेचत असतील त्या तुम्ही मागे टाकायला हव्यात' अशा कॅप्शनसह त्यांनी हे फोटो शेअर केले आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by IRIS (@irisphotography77)

घटस्फोटीत महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी अनोखा प्रयत्न

तिच्या इंस्टाग्रामवरून हे फोट  शेअर करत शालिनीने म्हटले आहे की, 'घटस्फोटित महिलेचा संदेश त्या लोकांसाठी ज्यांना चांगले विचार पटत नाहीत, ज्या लग्नाचा तुम्हांला त्रास होतो त्या लग्नातून मुक्त होणे गरजेचे आहे कारण तुम्ही आनंदी राहण्याचा तुम्हाला हक्क आहे  आणि कधीही तडजोड करू नका, तुमच्या जीवनावर नियंत्रण ठेवा आणि स्वतःचे आणि तुमच्या मुलांचे चांगले भविष्य घडवण्यासाठी आवश्यक बदल करा.'

शालिनीने पुढे म्हटले आहे की, 'घटस्फोट म्हणजे अपयश नाही! तुमच्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हा एक टर्निंग पॉइंट आहे. लग्न सोडून एकटे उभे राहण्यासाठी खूप धैर्य लागते, म्हणून मी हे माझ्या सर्व धाडसी महिलांना समर्पित करतो.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Brian Lara Birthday : 501 धावांची नाबाद खेळी! ब्रायन लाराची ऐतिहासिक कामगिरी, हा विक्रम मोडणं अवघड

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget