एक्स्प्लोर

Lockdown | लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात विमानसेवा सुरु होईल?

अजून विमानप्रवास कधी सुरु होणार याविषयी काहीच स्पष्टता नसल्याने त्याविषयी काय अटी किंवा निर्बंध असतील, याची चर्चा नेटिझन्समध्ये रंगलीय. जो ते आपापल्या परीने त्यात निर्बंध जोडण्याचा किंवा कमी करण्याचा प्रयत्न करतोय.

मुंबई : तब्बल 50 दिवसांपासून बंद असलेली हवाई वाहतूक सेवा कधी सुरु होणार याविषयी अजून काही निर्णय झालेला नाही, तरीही लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात देशांतर्गत हवाई वाहतूक सेवा सुरु होऊ शकते, अशी चर्चा आहे. मात्र त्यामध्ये अनेक निर्बंध असतील असंही सांगितलं जातंय. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर जेव्हा विमानसेवा सुरु होईल, तेव्हा हँड लगेज म्हणजे केबिनमध्ये सोबत घेऊन जाण्याच्या सामानावर निर्बंध असण्याची शक्यता आहे. तसंच अति ज्येष्ठ नागरिक म्हणजेच 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना यापुढे विमान प्रवास करता येणार नाही. तसंच विमान प्रवासात खाण्यापिण्याच्या वस्तूही मिळणार नाहीत, असं सांगितलं जातंय. अजून विमानप्रवास कधी सुरु होणार याविषयी काहीच स्पष्टता नसल्याने त्याविषयी काय अटी किंवा निर्बंध असतील, याची चर्चा नेटिझन्समध्ये रंगलीय. जो ते आपापल्या परीने त्यात निर्बंध जोडण्याचा किंवा कमी करण्याचा प्रयत्न करतोय. विमान वाहतूक क्षेत्रातल्या काही जाणकारांमध्ये मात्र लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात विमान वाहतूक होईल अशी चर्चा आहे. तिसऱ्या टप्प्यात रेल्वे सेवा मर्यादित आणि प्रायोगिक तत्वावर चालवली जातेय. त्याच प्रमाणे लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात म्हणजे 18 मे पासून मर्यादित स्वरुपात काही विमान फेऱ्यांना परवानगी मिळण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जातंय. काल रात्री 8 वाजता, देशाला उद्देशून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनचा चौथा टप्पा असेल, मात्र तो वेगळ्या रंगा-ढंगात असं असेल आवर्जून सांगितलं. यावरुनच चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती मिळतील तसंच निर्बंध खुले होतील असंही अनेकांना वाटत आहे. विमान वाहतूक मंत्रालयाने विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडून तसंच या क्षेत्रातील जाणकारांकडून एसओपी म्हणजे व्यावसाय करण्याची प्रमाणित पद्धतीबाबत सूचना मागवल्या आहेत. दोन प्रवाशांमधील शारिरीक अंतर तसंच स्वच्छता राखण्यासाठी काय काय उपाय योजना कराव्यात याची माहिती विचारण्यात आलीय. विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्या, एअरपोर्टवरील कर्मचारी वर्ग तसंच विमानातील कर्मचारी वर्ग या सर्वांसाठीच अशा एसओपी खूप महत्वाच्या असणार आहेत, त्यासाठीच अशा सर्व घटकांकडून एसओपीसाठीच्या सूचना आणि अभिप्राय मागवण्यात आले आहेत. काही जाणकारांच्या मते विमान प्रवास करण्यासाठी यापुढे आरोग्य सेतू हे अॅपही अनिवार्य केलं जाऊ शकतं. तसंच चेक इनसाठीही  वेब चेकइनचा पर्याय सुरवातीचे काही दिवस अनिवार्य केला जाऊ शकतो. त्यासोबतच मास्क तर अनिवार्य असेलच. विमान वाहतूक करणाऱ्या कंपन्यांसाठी म्हणजेच एअरलाईन्ससाठी असलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये विमानप्रवासा गरम जेवण बंद करणं तसंच प्रवाशांना वाचण्यासाठी मासिके किंवा अन्य पुस्तके न ठेवणं अशा बाबी असू शकतात. किमान तीन आधी चेक इन सुरु करणं तसंच विमानात प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशांचं थर्मल स्क्रीनिंग या बाबी आता अनिवार्य होऊ शकतात. विमानतळांसाठीही अनेक निर्बंध किंवा अनिवार्य सूचना लागू होण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामध्ये व्हिजिटर्सना विमानतळांवरील प्रवाशांच्या बाहेर पडण्याच्या ठिकाणी गर्दी करण्यास मनाई, दर अर्ध्या तासाला प्रवाशांचा वावर असलेली ठिकाणाचं निर्जंतुकीकरण करणं, शारिरीक अंतर राखण्यासाठीच्या खुणा आणि जिथे जिथे शक्य आहे तिथे ओपन एअर व्हेंटिलेशन या महत्वाच्या बाबी असतील.

महत्त्वाच्या बातम्या

Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
Global Diesel Crisis : डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Embed widget