एक्स्प्लोर

भारताची पहिली बुलेट ट्रेन गुजरातमध्येच धावणार?

त्यामुळे पालघरमधील शेतकऱ्यांनी सध्या तरी आपल्या जमिनी वाचल्याचा आनंद व्यक्त केला आहे.

पालघर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पहिला टप्पा आता गुजरात पुरताच मर्यादित राहण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता मुंबई ते अहमदाबादऐवजी, अहमदाबाद ते बिलिमोरापर्यंतच बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पहिला टप्पा राबवला जाईल. महाराष्ट्रात या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीच्या अधिग्रहणात खूप अडचणी येत आहेत. विशेषत: पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या सुपीक शेतजमिनी देण्यास सातत्याने विरोध केला आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन अधिग्रहणासाठी डिसेंबर 2018 पर्यंतची मुदत ठरवण्यात आली आहे. मात्र आजवर आवश्यक जमिनीचे अधिग्रहण होऊ शकलेले नाही. शिवाय निवडणूक तोंडावर आली असताना सक्तीने अधिग्रहण करण्याचे पाऊल उचलले जाणं अवघड मानलं जातं आहे. त्यामुळे पालघरमधील शेतकऱ्यांनी सध्या तरी आपल्या जमिनी वाचल्याचा आनंद व्यक्त केला आहे. आम्ही मुदतीत अधिग्रहण करु आणि प्रकल्पाला वेळेत सुरु करु, सध्या तरी दोन टप्प्यात प्रकल्पाचा विचार नाही, असं बुलेट ट्रेन प्रकल्प राबवणाऱ्या नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरशनच्यावतीने सांगितलं आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट 2022 रोजी बिलिमोरा ते अहमदाबाद या पहिल्या टप्प्यात बुलेट ट्रेन धावण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींनीच ही डेडलाईन निश्चित केली आहे. प्रस्तावित बुलेट ट्रेनच्या मार्गावर 12 स्थानकं (बीकेसी, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरुच, बडोदा, आणंद, साबरमती आणि अहमदाबाद) होती. त्यापैकी चार स्टेशन महाराष्ट्रात होते तर उर्वरित आठ स्टेशन गुजरातमध्ये होते. परंतु आता हा प्रकल्प गुजरातपुरताच मर्यादित असल्याने महाराष्ट्रातील बीकेसी, ठाणे, विरार आणि बोईसर ही स्थानकांचा यात समावेश नसेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ईव्हीएमविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक; पराभूत उमेदवाराच्या शहरातून निघेल पहिला 'मशाल मोर्चा'
ईव्हीएमविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक; पराभूत उमेदवाराच्या शहरातून निघेल पहिला 'मशाल मोर्चा'
Surabhi Hande : सुरभी हांडे 10 वर्षांनी पुन्हा म्हाळसाच्याच भूमिकेत! 'आई तुळजाभवानी' मालिकेत अभिनेत्रीची एन्ट्री
सुरभी हांडे 10 वर्षांनी पुन्हा म्हाळसाच्याच भूमिकेत! 'आई तुळजाभवानी' मालिकेत अभिनेत्रीची एन्ट्री
त्यांचे लाखोंनी चाहते, भेटण्यासाठी फॅन्स झुरायचे, 'असे' चार ॲक्टर्स ज्यांच्या मृत्यूचं रहस्य कोणालाच माहिती नाही!
त्यांचे लाखोंनी चाहते, भेटण्यासाठी फॅन्स झुरायचे, 'असे' चार ॲक्टर्स ज्यांच्या मृत्यूचं रहस्य कोणालाच माहिती नाही!
राज्यात बनावट औषध पुरवठ्याच्या बोगसगिरीची भांडाफोड, आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, वाचा स्पेशल रिपोर्ट
राज्यात बनावट औषध पुरवठ्याच्या बोगसगिरीची भांडाफोड, आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, वाचा स्पेशल रिपोर्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jyoti Gaikwad - Varsha Gaikwad : वर्षा गायकवाडांची बहीणीसोबत एन्ट्री,वडिलांच्या आठवणीने डोळे पाणावलेAbu Azmi Left MVA : विरोधकांचा आमच्याशी काही संबंध नाही, अबू आझमींचा मविआवर गंभीर आरोपSudhir Mungantiwar And Bhaskar Jadhav : सुधीर मुनगंटीवार विधानभवनात दाखलSudhir Mungantiwar And Bhaskar Jadhav Video:हातात हात घालून जाधव- मुनगंटीवार यांची विधानभवनात एँट्री

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ईव्हीएमविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक; पराभूत उमेदवाराच्या शहरातून निघेल पहिला 'मशाल मोर्चा'
ईव्हीएमविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक; पराभूत उमेदवाराच्या शहरातून निघेल पहिला 'मशाल मोर्चा'
Surabhi Hande : सुरभी हांडे 10 वर्षांनी पुन्हा म्हाळसाच्याच भूमिकेत! 'आई तुळजाभवानी' मालिकेत अभिनेत्रीची एन्ट्री
सुरभी हांडे 10 वर्षांनी पुन्हा म्हाळसाच्याच भूमिकेत! 'आई तुळजाभवानी' मालिकेत अभिनेत्रीची एन्ट्री
त्यांचे लाखोंनी चाहते, भेटण्यासाठी फॅन्स झुरायचे, 'असे' चार ॲक्टर्स ज्यांच्या मृत्यूचं रहस्य कोणालाच माहिती नाही!
त्यांचे लाखोंनी चाहते, भेटण्यासाठी फॅन्स झुरायचे, 'असे' चार ॲक्टर्स ज्यांच्या मृत्यूचं रहस्य कोणालाच माहिती नाही!
राज्यात बनावट औषध पुरवठ्याच्या बोगसगिरीची भांडाफोड, आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, वाचा स्पेशल रिपोर्ट
राज्यात बनावट औषध पुरवठ्याच्या बोगसगिरीची भांडाफोड, आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, वाचा स्पेशल रिपोर्ट
Vinod Kambli Love Story : रिसेप्शनिस्ट नोएला लुईस ते फॅशन मॉडेल अँड्रिया हेविटपर्यंत! विनोद कांबळीच्या व्यक्तीगत आयुष्यातील प्रेमाची सुद्धा शोकांतिका
रिसेप्शनिस्ट नोएला लुईस ते फॅशन मॉडेल अँड्रिया हेविटपर्यंत! विनोद कांबळीच्या व्यक्तीगत आयुष्यातील प्रेमाची सुद्धा शोकांतिका
भगवद्गगीता घेऊन भाजप आमदाराची शपथ; काँग्रेस खासदार संतापल्या, संविधानाची करुन दिली आठवण
भगवद्गगीता घेऊन भाजप आमदाराची शपथ; काँग्रेस खासदार संतापल्या, संविधानाची करुन दिली आठवण
शरद पवारांनी मारकडवाडीत केलेला विकास पाहावा, त्याचबरोबर मोहिते पाटलांनी बुडवलेल्या पतसंस्था, लुटलेल्या जमिनी पाहाव्यात, राम सातपुतेंचा हल्लाबोल
शरद पवारांनी मारकडवाडीत केलेला विकास पाहावा, त्याचबरोबर मोहिते पाटलांनी बुडवलेल्या पतसंस्था, लुटलेल्या जमिनी पाहाव्यात, राम सातपुतेंचा हल्लाबोल
Ind vs Aus 2nd Test Travis Head : सिराज अन् पंतची चूक टीम इंडियाला पडली महागात.... ट्रॅव्हिस हेडचा तांडव, ठोकले तुफानी शतक
सिराज अन् पंतची चूक टीम इंडियाला पडली महागात.... ट्रॅव्हिस हेडचा तांडव, ठोकले तुफानी शतक
Embed widget