इकडं अंकित गेला कावड यात्रेसाठी गेला अन् तिकडं चार महिन्यांपूर्वीच लग्न केलेली बायको जुन्या आशिकसोबत पळाली; निम्या वाटेतून परत आला, धक्का सहन न झाल्यानं...
अंकित कावड यात्रेवर गेला होता. यादरम्यान त्याला माहिती मिळाली की त्याची पत्नी दुसऱ्या तरुणासोबत पळून गेली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ही माहिती मिळताच अंकित कावड यात्रा अर्ध्यावर सोडून घरी परतला.

Young Man Ended Life: नोएडाच्या सेक्टर 45 मध्ये एका तरुणाने पत्नी चार महिन्यांमध्ये जुन्या प्रियकरासोबत फरार झाल्याने नैराश्यात येत आत्महत्या केली. मृताचे नाव अंकित आहे. त्याचे लग्न फक्त चार महिन्यांपूर्वी झाले होते. अंकित कावड यात्रेवर गेला होता. यादरम्यान त्याला माहिती मिळाली की त्याची पत्नी दुसऱ्या तरुणासोबत पळून गेली आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ही माहिती मिळताच अंकित कावड यात्रा अर्ध्यावर सोडून घरी परतला. तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला. व्यथित होऊन त्याने आत्महत्या केली.
आता पुरं झाले, आता शेवटचा निरोप घेतो..
"आता पुरे झाले, आता शेवटच्या वेळेला निरोप" आत्महत्या करण्यापूर्वी अंकितने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. व्हिडिओमध्ये तो "आता पुरे झाले, आता शेवटच्या वेळेला निरोप" असे म्हणत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये अंकित अस्वस्थ दिसत होता. त्याच्या डोळ्यातही अश्रू होते. व्हिडिओ बनवल्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर त्याच्या कुटुंबाने आक्रोश केला. त्यांनी "अंकितला न्याय द्या" अशा घोषणा दिल्या. कुटुंबाने सेक्टर-39 पोलिस ठाण्यात अंकितची पत्नी, सासू, सासरे आणि एका अज्ञात तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी 29 जुलै रोजी गुन्हा दाखल केला.
काही आरोप खोटे आणि निराधार असल्याचे आढळले
एका व्यक्तीला अटक केल्यानंतर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. नोएडा पोलिस मीडिया सेलच्या म्हणण्यानुसार, तपासादरम्यान, आरोपी 'क्रिश'ला 1 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आणि त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी असेही म्हटले आहे की काही आरोप खोटे आणि निराधार असल्याचे आढळले आहे. प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे.
नवऱ्याला मारून नाल्यात फेकलं
दुसरीकडे, दिल्ली पोलिसांनी एका महिलेला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून तिच्या पतीला मारण्याचा कट रचला होता. तिने तिच्या पतीला मारण्यासाठी पैसे देऊन मृतदेह नाल्यात फेकून दिला. अटक केलेल्या आरोपींची ओळख पटली असून 34 वर्षीय सोनिया आणि दिल्लीतील अलीपूर येथील रहिवासी आणि तिचा 28 वर्षीय प्रियकर रोहित, सोनीपत येथील रहिवासी आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणातील दुसरा आरोपी विजय हा फरार आहे. विजय हा सोनियाचा मेहुणा आहे आणि त्याने 50 हजार रुपयांची सुपारी घेत प्रीतमची हत्या केली. पोलिस तपासात असे समोर आले आहे की, आरोपी महिला सोनियाने तिच्या बहिणीचा दीर विजयला तिच्या पतीला मारण्यासाठी 50 हजारांची सुपारी दिली होती. हत्येनंतर विजयने इन्स्टाग्रामवर प्रीतमच्या मृतदेहाचा व्हिडिओ आणि फोटो सोनियाला पाठवला आणि पैसे मागितले. त्यानंतर सोनियाने तिच्या पतीची ऑटो विकली आणि उर्वरित रक्कम त्याला दिली.
इतर महत्वाच्या बातम्या























