(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काळ्या बुरशीपाठोपाठ आता पांढऱ्या बुरशीचाही धोका; बिहारमध्ये चार रुग्णांना लागण, काय आहे हा घातक आजार?
White Fungus : पांढऱ्या बुरशीचा संसर्ग काळ्या बुरशीच्या तुलनेत अधिक धोकादायक आहे. बिहारमध्ये चार रुग्णांना या आजाराची लागण झाली आहे. पांढऱ्या बुरशीचा फुप्फुसातील संसर्ग हा HRCT मध्ये कोरोनासारखा दिसतो. त्यामुळे कोरोना आहे की, व्हाइट फंगस हे ओळखणं अवघड जातं.
White Fungus : कोरोनासोबतच देशात ब्लॅक फंगसचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. आता ब्लॅक फंगसनंतर (Black Fungus) आता व्हाइट फंगस (White Fungus) चे रुग्ण आढळून आले आहेत. बिहारच्या पाटणामध्ये व्हाइट फंगस म्हणजेच, पांढऱ्या बुरशीचे 4 रुग्ण आढळून आले आहेत. काळ्या बुरशीपेक्षा पांढरी बुरशी जास्त घातक असल्याची माहिती पटना मेडीकल कॉलेजचे हेड डॉ. एसएन सिंह यांनी दिली आहे. सापडलेल्या चारही रुग्णांमध्ये कोरोनासारखी लक्षणं आढळली आहेत. दरम्यान कोरोना संदर्भातील औषधांचा कोणताही परिणाम या बुरशीवर होत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
मेडिकल रिपोर्ट्सनुसार, पांढऱ्या बुरशीचा संसर्ग काळ्या बुरशीच्या तुलनेत अधिक धोकादायक आहे. दरम्यान, अद्याप पांढऱ्या बुरशीचा संसर्ग इतरही राज्यांमध्ये आहे का, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पीएमसीएचमध्ये मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर एसएन सिंह यांनी पांढऱ्या बुरशीच्या संसर्गाचा खुलासा केला होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉक्टर एसएन सिंह यांनी सांगितलं होतं की, पांढऱ्या बुरशीचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये कोविडसदृश्य लक्षणं आढळून आली आहेत. परंतु, रुग्णांची कोरोना चाचणी केल्यावर त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. सुदैवानं सर्व रुग्णांवर अॅन्टी फंगल औषधांनी उपचार करण्यात आले. तज्ज्ञांनी काही सल्ले दिले आहेत की, पांढऱ्या बुरशीचा संसर्ग झाल्याचं निदान HRCT प्रमाणे स्कॅन केल्यानंतर होतं.
काय आहे पांढऱ्या बुरशीचा आजार?
पांढऱ्या बुरशीचा फुप्फुसातील संसर्ग हा HRCT मध्ये कोरोनासारखा दिसतो. त्यामुळे कोरोना आहे की, व्हाइट फंगस हे ओळखणं अवघड जातं. अशा रुग्णांच्या रॅपिड अँटिजन आणि आरटीपीसीआर चाचण्या निगेटिव्ह येतात. पण करोना रुग्ण ऑक्सिजनवर असेल तर त्याच्या फुप्फुसांना पांढऱ्या बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. पांढऱ्या बुरशीचा आजार हा प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे होतो. मधुमेह, अँटिबायोटिक घेणं किंवा फार काळ स्टिरॉइड घेतलेल्या रुग्णांना हा आजार बळावण्याची शक्यता असते. कॅन्सरग्रस्त रुग्णांना या आजाराचा धोका अधिक असतो. तसेच अर्भक किंवा नुकत्याच जन्मलेल्या बाळांनाही या आजाराचा धोका असतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :