Coronavirus Cases in India : देशात गेल्या 24 तासात 2.59 लाख नव्या रुग्णांची भर तर 4209 रुग्णांचा मृत्यू
Coronavirus Update : जगात दरदिवशी कोरोनामुळे होण्याऱ्या मृत्यूपैकी प्रत्येकी तिसरा मृत्यू हा भारतात होत आहे तर कोरोनाचे 40 टक्के रुग्ण भारतात सापडत आहेत.
नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये कालच्या तुलनेत काहीशी घट झाल्याचं दिसून येतंय. गुरुवारी एकाच दिवसात देशात 2,59,551 नव्या रुग्णांची भर पडली असून 4209 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. गुरुवारी 3,57,295 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. बुधवारच्या तुलनेत देशातील सक्रिय रुग्णांची संख्या एक लाख एक हजार 953 ने कमी झाली आहे. बुधवारी देशात 2.76 लाख नव्या रुग्णांची भर पडली होती तर 3874 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
गुरुवारपर्यंत देशात 19 कोटी 18 लाख 79 हजार 503 कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत. गुरुवारी एकाच दिवशी देशात 14 लाख 82 हजार 754 कोरोनाच्या लसी देण्यात आल्या. आतापर्यंत 32 कोटीहून जास्त कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशातील आजची कोरोना स्थिती :
- एकूण कोरोनाबाधित रुग्ण : दोन कोटी 60 लाख 31 हजार 991
- एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 27 लाख 12 हजार 735
- एकूण सक्रिय रुग्ण : 30 लाख 91 हजार 331
- कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 2 लाख 91 हजार 331
राज्यातील स्थिती
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे. आज 47,371 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 29,911 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण 50,26,308 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.4 टक्के एवढे झाले आहे.
राज्यात गुरुवारी 738 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.55 टक्के एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,21,54,275 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 54,97,448 (17.9 टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात 29,35,409 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 21,648 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण 38,32,253 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
गुरुवारी मुंबईत 1425 नवीन रुग्णांचं निदान झालं आहे तर 1460 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 59 जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
महत्वाच्या बातम्या :