एक्स्प्लोर
गृहकर्जदरातील कपातीमुळे EMI कमी होणार नाहीत, तर...
मुंबई : एसबीआयने व्याजदरात कपात केल्यामुळे कर्जदारांना नववर्षाच्या सुरुवातीलाच गुड न्यूज मिळाली आहे. 20 ते 25 वर्ष इतका दीर्घ कालावधी असलेल्या कर्जदारांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. कर्जदरातील कपात ही विशेषतः कर्जाच्या टेन्युअर म्हणजेच कालावधीत घट करणारी ठरली आहे.
90 बेसिस पॉइंट्सच्या कपातीमुळे कर्ज परतफेडीची 25 वर्षांची मुदत तब्बल पाच वर्षांनी कमी झाली आहे, तर 20 वर्षांची मुदत तीन वर्षांनी घटली आहे. थोडक्यात कर्जाच्या व्याजदरात घट झाल्यावर बँका ईएमआयची रक्कम कमी करत नाहीत, तर नव्या दराला अनुरुप कर्जाची मुदत बदलतात.
ज्या कर्जाचा कालावधी संपत आला आहे, त्याला मात्र फारसा फरक पडणार नाही. जी गृहकर्ज 'मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट' (एमसीएलआर)शी लिंक केलेली आहेत, त्यांनाही तूर्तास बदल जाणवणार नाही. मात्र तज्ज्ञांनी एमसीएलआरवर शिफ्ट होण्याचा सल्ला दिला आहे. कर्जदारांना एमसीएलआरवर शिफ्ट होण्यासाठी कन्व्हर्जन फी द्यावी लागेल, मात्र ईएमआय कमी असल्याने ही तूट लगेच भरुन निघेल.
25 वर्षांच्या कर्जाच्या ईएमआयवर होणारा परिणाम
बँकांकडून नवीन वर्षाचं गिफ्ट, व्याजदरात मोठी कपात
25 वर्षांसाठी 50 लाखांचं कर्ज असलेल्या कर्जदारांचा ईएमआय 9.15 टक्क्यांवरुन 8.25 टक्क्यांवर गेल्यास ग्राहकाला दरमहा तीन हजार रुपयांची बचत करता येईल. 50 लाखांच्या कर्जाच्या मुदतीवर होणारा परिणामEMI (रुपयांत) | कर्जाची मूळ मुदत (9.15 टक्क्यांनुसार) | कर्जाची नवी मुदत (8.25 टक्क्यांनुसार) | मुदतीत झालेली घट |
42 हजार 475 | 300 महिने | 242 महिने | 58 महिने |
45 हजार 470 | 240 महिने | 206 महिने | 34 महिने |
51 हजार 160 | 180 महिने | 162 महिने | 18 महिने |
63 हजार 744 | 120 महिने | 113 महिने | 7 महिने |
1 लाख 4 हजार 156 | 60 महिने | 58 महिने | 2 महिने |
कर्जाची रक्कम (रुपयांत) | 9.15 टक्क्यानुसार ईएमआय (रुपयांत) | 8.25 टक्क्यानुसार नवा ईएमआय (रुपयांत) | ईएमआयमधील बचत (रुपयांत) |
20 लाख | 16 हजार 990 | 15 हजार 770 | 1 हजार 220 |
30 लाख | 25 हजार 485 | 23 हजार 655 | 1 हजार 830 |
50 लाख | 42 हजार 475 | 39 हजार 425 | 3 हजार 50 |
एक कोटी | 84 हजार 950 | 78 हजार 850 | 6 हजार 100 |
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement