West Nile Virus : 'वेस्ट नाईल' तापामुळे केरळमध्ये 47 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; काय आहे हा आजार जाणून घ्या लक्षणं
West Nile Virus in Kerala : केरळमध्ये 'वेस्ट नाईल' तापामुळे मृत्यूची पहिली घटना समोर आली आहे. यामध्ये एका 47 वर्षीय व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.
West Nile Virus in Kerala : केरळमध्ये 'वेस्ट नाईल' तापामुळे मृत्यूची पहिली घटना समोर आली आहे. रविवारी, 29 मे रोजी राज्याच्या त्रिशूर जिल्ह्यात पश्चिम नाईल तापामुळे एका 47 वर्षीय व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. राज्य सरकारने वेस्ट नाईल तापाबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून लोकांना सावध राहण्यास सांगितले आहे.
थ्रिसूरमधील 47 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ही गेल्या तीन वर्षांतील पहिलीच घटना आहे. त्रिशूर जिल्ह्यातील पंचेरी येथील रहिवासी असलेल्या पुथनपुरक्कल जोबी यांना 17 मे रोजी तापाची लक्षणे दिसू लागली, त्यानंतर त्यांना त्रिशूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. जेथे त्यांना पश्चिम नाईल तापाने त्रस्त असल्याचे निदान कळविण्यात आले.
केरळच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेस्ट नाईल मृत्यू प्रकरणानंतर म्हटले आहे की, हा रोग रोखण्यासाठी डासांची वाढ नियंत्रित करणे आणि स्त्रोत नष्ट करणे आवश्यक आहे. जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. वेस्ट नाईल तापामध्ये जपानी तापासारखीच लक्षणे आहेत. मात्र, काळजी करण्यासारखे काही नाही, असे वीणा जॉर्ज यांनी स्पष्ट केले आहे. मंत्र्यांनी राज्यातील लोकांना विनंती केली की त्यांना ताप किंवा आजाराची इतर लक्षणे आढळल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करावे.
केरळच्या आरोग्य विभागाने सांगितले की, वेस्ट नाईल ताप हा क्युलेक्स प्रजातीच्या डासांमुळे पसरतो. युगांडामध्ये हा रोग पहिल्यांदा 1937 मध्ये सापडला होता. 2011 मध्ये केरळमध्ये या तापाची पहिली केस नोंदवली गेली आणि 2019 मध्ये मलप्पुरममधील सहा वर्षांच्या मुलाचा या तापामुळे मृत्यू झाला.
West Nile Fever ची कारणे :
वेस्ट नाईल ताप हा उन्हाळ्याच्या महिन्यात येतो. मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया यांसारख्या डासांमुळे पसरणारे इतर आजार त्याप्रमाणेच हा आजार आहे. क्युलेक्स प्रजातीच्या डासांमुळे पसरणाऱ्या वेस्ट नाईल तापाने यापूर्वी 2019 मध्ये केरळमध्ये एकाचा बळी घेतला होता. संक्रमित डास चावणे हा मानवांमध्ये वेस्ट नाईल तापाचा संसर्ग होण्याचा सर्वात सामान्य प्रकार आहे. रक्त संक्रमणाद्वारे, प्रयोगशाळांमध्ये विषाणूच्या संपर्कात आल्याने किंवा संक्रमित मातेकडून तिच्या मुलामध्ये हा संसर्ग पसरू शकतो.
West Nile Fever ची लक्षणे :
वेस्ट नाईल फिव्हरची लक्षणे इतर कोणत्याही विषाणूजन्य तापासारखीच असतात, ज्यात डोकेदुखी, ताप, अशक्तपणा यांसारखी लक्षणे आढळतात. तसेच मज्जासंस्थेची लक्षणे देखील होऊ शकतात जसे की, दिशाभूल आणि दृष्टी कमी होणे.
महत्वाच्या बातम्या :
- World No-Tobacco Day 2022 : Quit Tobacco हेल्पलाईनमुळे 3 वर्षांत तब्बल 12 हजार जण तंबाखूमुक्त
- World No-Tobacco Day 2022 : धूम्रपान करणाऱ्यांनो वेळीच सावध व्हा! तुम्हालाही अंधत्व येऊ शकतं
- Home Remedies For Piles: मूळव्याधाने त्रस्त आहात? आराम मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा..
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )