एक्स्प्लोर

Mamata Banerjee Head Injury: ममता बॅनर्जींच्या डोक्याला तीन टाके, ईसीजी-सीटी स्कॅननंतर रुग्णालयातून डिस्चार्ज

Mamata Banerjee: टीएमसीनं सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटलं होतं की, आमच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी गंभीर जखमी झाल्या आहेत. कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा.

Mamata Banerjee Injury: नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Chief Minister Mamata Banerjee) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून घरी ट्रेडमिलवर चालतेवेळी कोसळल्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. योग्य ते उपचार आणि तपासण्या केल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. 

डोक्याला दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांचं एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणार आहे. पश्चिम बंगालमधील एसएसकेएम रुग्णालयाचे संचालक डॉ. मणिमॉय बंदोपाध्याय यांनी यासंदर्भात माहिती दिली. घरी पाय घसरून पडल्यानं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, तिथे डॉक्टरांनी त्यांच्या जखमेवर टाके घालून उपचार केले. तसेच, त्यानंतर आवश्यक त्या सर्व तपासण्या देखील करण्यात आल्या आहेत. 

रुग्णालयाचे संचालक डॉ. मनिमॉय बंदोपाध्याय यांनी गुरुवारी (14 मार्च) रात्री प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, ममता बॅनर्जी यांना झालेल्या दुखापतीवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. त्यांनी सांगितलं की, मुख्यमंत्र्यांना मागून धक्का लागल्यामुळे त्या पाय घसरुन पडल्या. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयाच्या संचालकांनी सांगितलं की, डॉक्टरांनी त्यांच्या कपाळावर तीन टाके घातले आणि एक टाका नाकाला झालेल्या दुखापतीला घातला आहे.

दुखापतीमुळे रक्तस्त्राव 

डॉ. मनिमॉय बंदोपाध्याय म्हणाले की, "आम्हाला संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मुख्यमंत्र्यांची माहिती मिळाली की, मागून ढकलल्यामुळे त्या घरात पडल्या आहेत. त्यांच्या डोक्याला जखम झाली असून कपाळ आणि नाकावर दुखापत झाली आहे. त्यामुळे खूप रक्तस्त्राव झाला होता. ते म्हणाले की, "रुग्णालयातील एचओडी न्यूरोसर्जरी, एचओडी मेडिसिन आणि कार्डिओलॉजिस्ट यांनी ममता बॅनर्जींची तपासणी केली. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसेच, सर्व आवश्यक तपासण्या करुन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. 

यापूर्वीही ममता बॅनर्जींना झालेली दुखापत 

ममता बॅनर्जी यांना यापूर्वी अनेकदा अपघातांना आणि दुखापतींना सामोरं जावं लागलं आहे. 2021 मध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर काही महिने उपचार सुरु होते. हा अपघात झाला तेव्हा पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका सुरू होत्या. ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम येथील आपल्या प्रचाराला सुरुवात केली होती. दरम्यानच्या काळात त्यांना अपघात झाला होता. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. 

त्यानंतर ममता बॅनर्जी यांना 2023 मध्येही अपघात झाला होता. हा अपघात सिलीगुडी येथे झाला होता. त्यांच्या हॅलिकॉप्टरची एमरजन्सी लँडिग करावी लागली होती. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती. शिवाय डाव्या गुडघ्याला आणि पाठीलाही काही जखमा झाल्या होत्या. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget