एक्स्प्लोर
Advertisement
प्रसिद्ध साहित्यिक नामवर सिंह यांचे निधन, वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
त्यांनी छायावाद (1955), इतिहास और आलोचना(1957), कहानी : नयी कहानी (1964), कविता के नए प्रतिमान (1968), दूसरी परंपरा की खोज(1982), वाद विवाद संवाद (1989), यासारख्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. त्यांची मुलाखत असलेले 'कहना न होगा' हे पुस्तक देखील साहित्य जगतात प्रसिद्ध आहे.
नवी दिल्ली: हिंदी साहित्यातील प्रसिद्ध लेखक, समीक्षक नामवर सिंह यांचे काळ रात्री वयाच्या 92 वर्षी निधन झाले. एका महिन्यापासून दिल्लीतील एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे लाईफ सपोर्ट सिस्टमवर होते. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार नामवर सिंह यांच्यावर बुधवारी दिल्लीतील लोधी रोडवर असलेल्या समशान घाटात दुपारी अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
नामवर सिंह यांचा जन्म 28 जुलै 1927 रोजी वाराणसीमधील एका छोट्या गावात झाला होता. हिंदी साहित्यमध्ये त्यांनी एमए आणि पीएचडीचे शिक्षण घेतले आहे. त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 1959 मध्ये चकिया-चंदौलीमधून कम्युनिस्ट पार्टीकडून त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली आहे. पण त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. त्यांनी छायावाद (1955), इतिहास और आलोचना(1957), कहानी : नयी कहानी (1964), कविता के नए प्रतिमान (1968), दूसरी परंपरा की खोज(1982), वाद विवाद संवाद (1989), यासारख्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. त्यांची मुलाखत असलेले 'कहना न होगा' हे पुस्तक देखील साहित्य जगतात प्रसिद्ध आहे. ते 1959-60 मध्ये सागर विश्वविद्यालय (म.प्र.) हिंदी विभागात सहायक प्राध्यापक होते. 1960 ते 1965 पर्यंत त्यांनी वाराणसीतून स्वतंत्र लेखन केले. 1965 मध्ये 'जनयुग’ साप्ताहिकाचे संपादक म्हणून दिल्लीत काम केले. 1967 पासून त्यांनी 'आलोचना’ त्रैमासिकाचे संपादक सुरु केले होते. वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करताना त्यांनी आपली साहित्यसेवा सुरूच ठेवली होती. त्यांनी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ वर्धाचे कुलाधिपती म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. दरम्यान, नामवर सिंह यांना देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीटरवरून श्रद्धांजली अर्पण करून सिंह यांचे निधन ही व्यक्तिगत हानी झाली असल्याचे म्हटले आहे.Hindi literary critic & author Professor Namvar Singh passed away at AIIMS Trauma Centre, Delhi at 11:51 pm, 19 February. pic.twitter.com/Z0e5xFu77V
— ANI (@ANI) February 19, 2019
डा. नामवर सिंह का जाना मेरे लिए व्यक्तिगत क्षति भी है। विचारों से असहमति होने के बावजूद वे लोगों को सम्मान और स्थान देना जानते थे। उनका निधन हिंदी साहित्य जगत एवं हमारे समाज के लिए एक अपूरणीय क्षति है। मैं उनके परिवार के प्रति अपनी हार्दिक संवेदना व्यक्त करता हूँ।
— Rajnath Singh (@rajnathsingh) February 20, 2019
हिंदी के प्रख्यात आलोचक और साहित्यकार नामवर सिंह जी अब हमारे बीच नहीं रहे। हिंदी साहित्य में आलोचना को एक नया आयाम और नई ऊंचाई देने वाले नामवर सिंह जी को विनम्र श्रद्धांजलि। परमात्मा उनकी आत्मा को शांति और उनके परिजनों को यह दुख सहन करने की शक्ति दें।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 20, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement