Weather Updates : उत्तर भारतात थंडी कायम, काही ठिकाणी बर्फवृष्टी, 'या' राज्यांमध्ये ऑरेंज आणि येलो अलर्ट
Weather Updates : उत्तर भारतात थंडीची लाट पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये 13 जानेवारीपर्यंत येलो अलर्ट देण्यात आला आहे.
Weather Updates in india : देशभरात वातावरणात (Temperature Drop) गारवा पाहायला मिळतोय. पाऊस (Rain), बर्फवृष्टी(Snowfall) आणि थंडीची लाट(Cold Wave) यामुळे तापमानात सातत्याने घट होत आहे. उत्तर भारतात थंड वारे वाहत आहेत. अनेक डोंगराळ भागात बर्फवृष्टी आणि मैदानी भागात पाऊस यामुळे हवामानातील बदल दिसून येत आहे. परिणामी महाराष्ट्रात तापमानात कमालीची घट झाली आहे. जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) पासून राजस्थान (Rajsthan) पर्यंत थंडीचा जोर वाढला आहे. बिहारच्या अनेक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. हवामान खात्याने बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालसाठी 11 जानेवारी ते 13 जानेवारी या कालावधीत येलो अलर्ट जारी केला आहे.
ओदिशा (Odisha), छत्तीसगड (Chhattisgarh), झारखंड (Jharkhand) आणि पश्चिम बंगाल (West Bengal) मध्ये ढगाळ वातावरण आहे. हवामान खात्याने पूर्व भारतातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश, गुजरात या भागात थंड वारे वाहत असून, त्यामुळे तापमानात घट झाली आहे.
जम्मू-काश्मीरच्या अनेक भागात बर्फवृष्टी
दुसरीकडे, जम्मू-काश्मीरच्या बहुतांश भागात सध्या जोरदार बर्फवृष्टी होत आहे. गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या हिमवृष्टीने लोकांच्या अडचणी दुपटीने वाढल्या आहेत. कडाक्याच्या थंडीने अनेक विक्रम मोडले. तापमानात सरासरीपेक्षा 4 ते 6 अंशांनी घट झाली आहे. येथील अनेक रस्ते पूर्णपणे बर्फाने झाकले गेले आहेत. मुसळधार बर्फवृष्टीमुळे वाहनांच्या वाहतुकीलाही अडचणी येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- Cold Weather : राज्यात हुडहुडी, महाबळेश्वरमध्ये शून्य अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
- Coronavirus Cases in India : तिसरी लाट धडकली? गेल्या 24 तासातील नव्या रुग्णांचा आकडा दोन लाखांच्या जवळ
- नागपूरमध्ये नव्या पद्धतीनं होणार जिनोम सिक्वेसिंग, दोन दिवसांत मिळणार अहवाल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha