एक्स्प्लोर

Weather Updates : उत्तरेकडील राज्यांत पाऊस, बर्फवृष्टी; महाराष्ट्रातही अवकाळी पावसाची शक्यता

तिथं काश्मीरचा पारा सातत्यानं खाली जात असतानाच राजधानी दिल्लीवर मात्र पावसाचा शिडकावा सुरु आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार ....

Weather Updates देशातील उत्तरेकडे असणाऱ्या अनेक राज्यांमध्ये सोमवारपासूनच काहीशा वेगळ्याच वातावरणाची नोंद केली जात आहे. या राज्यांच्या मैदानी भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि पावसाची नोंद केली जात आहे. तर, पर्वतीय भागांमध्ये तापमानाच कमालीची घट झाली असून, बहुतांश ठिकाणी बर्फवृष्टीही झाली आहे. मोठया प्रमामात बर्फवृष्टी झाल्यामुळं जम्मू काश्मीर येथील जम्मू - श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग आणि मुघल रोड बंद झाले. परिणामी सलग दुसऱ्या दुवशी काश्मीरचा देशाच्या इतर भागांशी असणारा संपर्क तुटला.

तिथं काश्मीरचा पारा सातत्यानं खाली जात असतानाच राजधानी दिल्लीवर मात्र पावसाचा शिडकावा सुरु आहे. यातच भर म्हणजे इथं काही भागांत गारपीटही पाहायला मिळाली. हवामान खात्याच्या माहितीनुसार सलग तिसऱ्या दिवशी दिल्लीत अवकाळी पाऊस झाला. ज्याचे थेट परिणाम तेथील तापमानावर दिसून आले.

Corona Vaccine | कोरोना लसीबाबत नेमकी कोणती काळजी घ्याल?

उत्तराखंडातही बर्फवृष्टी

उत्तराखंडमध्ये असणाऱ्या गढवाल आणि कुमाऊँ या उंच पर्वतरांगांमध्ये मंगळवारी जोरदार बर्फवृष्टी झाली. कर, काही भागांत पाऊसही पाहायला मिळाला. ज्यामुळं इथं थंडीचं प्रमाणही मोठ्या फरकानं वाढलं. केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, मुनस्यारी या भागांमध्ये बर्फाची चादरच तयार झाली.

तिथं पंजाब आणि हरयाणामध्येही थंडीचा कडाका पाहायला मिळाला. तर, राजस्थानमध्ये मात्र बहुतांश भागात पावसाचा शिडकावा झाला. महाराष्ट्रातही चित्र काही वेगळं नव्हतं.

मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. याचा थेट परिणाम इथल्या तापमानावर आणि शेती व्यवसायावर झाला. पुढील काही दिवसांसाठीही इथं अशाच प्रकारच्या वातावरणाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम किनारपट्टीवर द्रोणीय स्थितीचा (ट्रफ) परिणाम आगामी ३ दिवस टिकून राहण्याची शक्यता आहे. हवामानात सातत्यानं होणाऱ्या या बदलांमुळं नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन संबंधित प्रशासकिय यंत्रणांकडून करण्यात येत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 6 AM : 30  सप्टेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 30 सप्टेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 6.30 PM: 30 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMahayuti Seat Sharing Formula : जागावाटप, उमेदवारांबाबत नेमकं काय ठरलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget