Mansukh Mandaviya : जागतिक बाजारपेठ काबीज करण्यासाठी 'आकारमाना' वरुन 'मूल्य' विषयक नेतृत्वाकडे जाण्याची गरज : मनसुख मांडविया
जागतिक औषध बाजारपेठ काबीज करण्यासाठी आपण 'आकारमाना' वरुन 'मूल्य' विषयक नेतृत्वाकडे जाण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केले.
Mansukh Mandaviya : जागतिक औषध बाजारपेठ काबीज करण्यासाठी आपण 'आकारमाना' वरुन 'मूल्य' विषयक नेतृत्वाकडे जाण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय रसायने, खते, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ. मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी व्यक्त केलं. जगातील सर्वोत्तम संशोधन, उत्पादन आणि सर्जनशील पद्धतींमधून ज्ञान मिळवणे. तसेच देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी स्वतःचे मॉडेल विकसित करुन उत्पादनाला गती देणं आणि जागतिक बाजारपेठेतील आपला सहभाग वाढवणं यावर लक्ष केंद्रित करण्याची हीच वेळ असल्याचे ते म्हणाले.
भारताच्या 'फार्मा व्हिजन 2047' आणि भारतीय औषध निर्माण क्षेत्रातील पुढील वाटचाल कशी असेल यावर चर्चा करणे हा या बैठकीचा उद्देश होता. भारतातील औषधे निर्माण करणार्या उद्योगाची सद्यस्थिती, सरकारने गेल्या काही वर्षात राबवलेले महत्त्वाचे उपक्रम आणि भारताला ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सहकार्य करणार्यांसंदर्भात या सत्रात चर्चा करण्यात आली आहे. भारतीय फार्मास्युटिकल अलायन्स संघटनेसोबतच्या संवादात्मक सत्रात औषधे निर्माण करणार्या उद्योगातील दिग्गजांना आणि आघाडीवर असणाऱ्या व्यक्तींना त्यांनी यावेळी प्रोत्साहन दिले.
उद्योगाला स्थिरता देणाऱ्या दीर्घकालीन धोरणांचं महत्त्व
औषध निर्माण करणार्या कंपन्यांना पाठिंबा देण्यासाठी, उद्योगाला पूरक अशी धोरणे आणि गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देणाऱ्या पूरक व्यवस्थेसह सरकार कटिबद्ध आहे. तसेच हे सरकार सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवते. आपली धोरणे ही व्यापक आणि सर्वसमावेशक भागधारकांच्या सल्लामसलतीवर आधारित असून, ती सर्वसमावेशक, दीर्घकालीन आणि सचेतन धोरण व्यवस्था निर्माण करण्यास उपयुक्त असल्याचे मनसुख मांडविया यांनी सांगितले. या धोरणांव्यतिरिक्त, काळाची गरज असलेल्या संशोधन आणि विकास, कार्यक्षम उत्पादन क्षमता आणि नवीन उपक्रमांसाठी पुरेशा संधी निर्माण करण्यावर देखील डॉ. मांडविया यांनी भर दिला.
अशा महत्वपूर्ण टप्प्यांतून आपण या क्षेत्रासाठी एक सचेतन आणि सक्रीय पूरक व्यवस्था निर्माण करू शकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या: