Corona Vaccination : 12-14 वर्षे वयोगटातील 3 कोटीहून अधिक मुलांना मिळाला लसीचा पहिला डोस, केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले...
Corona Vaccination : मनसुख मांडविया यांनी ट्विट केले की, 12-14 वयोगटातील तीन कोटीहून अधिक मुलांना कोविड लसीचा पहिला डोस मिळाला आहे. लसीकरण झालेल्या माझ्या सर्व तरुण योद्ध्यांचे अभिनंदन!
Corona Vaccination : देशातील कोरोना लसीकरणाचे आकडे रोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहेत. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करत सांगितले की, आतापर्यंत 12-14 वयोगटातील तीन कोटीहून अधिक मुलांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. माहितीनुसार, या वयोगटातील मुलांचे लसीकरण 16 मार्च 2022 पासून सुरू झाले. त्यांना कोरोनाची लस दिली जात आहे. या लसीचा दुसरा डोस 28 दिवसांच्या अंतराने द्यावा लागतो.
तब्बल 3 कोटीहून अधिक मुलांना मिळाला कोविड लसीचा पहिला डोस
मांडविया यांनी ट्विट केले की, 12-14 वयोगटातील 3 कोटीहून अधिक मुलांना कोविड लसीचा पहिला डोस मिळाला आहे. लसीकरण झालेल्या माझ्या सर्व तरुण योद्ध्यांचे अभिनंदन. गती कायम ठेवा!' देशात आतापर्यंत अँटी-कोविड-19 लसीचे कोट्यवधी डोस देण्यात आले आहेत. राष्ट्रीय आरोग्य अधिकार्यांच्या मते, 1 मार्चपासून देशात संसर्गाची 56,000 हून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. यापैकी निम्म्याहून अधिक प्रकरणे उत्तर-पूर्व जिलिन प्रांतातून आली आहेत आणि त्यात लक्षणे नसलेल्या प्रकरणांचा समावेश आहे.
टीकाकरण अभियान में बच्चे दे रहे हैं महत्वपूर्ण योगदान!
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) May 9, 2022
Over 3⃣ crore youngsters between 12-14 age group have received 1st dose of #COVID19 vaccine.
Congratulations to all my young friends who got vaccinated. pic.twitter.com/SdHfALZyua
राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण
देशात जरी कोरोना रुग्णांची (CoronaVirus) संख्या वाढत असली तरी महाराष्ट्र राज्यात मात्र त्या उलट चित्र आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येत काही प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. काल राज्यात 223 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 161 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 98.11 टक्क्यांवर पोहोचलं आहे.
लसीकरणाबाबत लोकांना जागरुक करणे हे एक मोठे आव्हान
आतापर्यंत देशात 156 कोटीहून अधिक कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. गेल्या वर्षी 16 जानेवारीपासून देशातील आरोग्य कर्मचारी आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांना लस देऊन लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती. या एका वर्षात लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी सरकारला मोठी कसरत करावी लागली. लसीकरणाबाबत लोकांना जागरुक करणे हे एक मोठे आव्हान असताना दुसरीकडे त्याची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले.