एक्स्प्लोर

आम्ही वडिलांच्या मारेकऱ्यांना माफ केलंय : राहुल गांधी

'माझी आजी म्हणाली होती की तिचा मृत्यू होणार आणि माझ्या वडिलांना मी सांगितलं होतं की त्यांचा मृत्यू होणार.' असं राहुल गांधी यांनी सांगितलं.

नवी दिल्ली : आम्ही आमच्या वडिलांच्या मारेकऱ्यांना पूर्णपणे माफ केलं आहे, असं सांगताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी भावुक झाले. 'आमच्या वडिलांचा, आजीचा मृत्यू होणार, हे आम्हाला माहित होतं' असंही राहुल गांधी म्हणाले. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा जीव घेणाऱ्यांना आपण आणि बहीण प्रियंका गांधी यांनी माफ केल्याचं राहुल गांधी म्हणाले. 'अनेक वर्ष आम्ही निराश आणि दुखावलो होतो. पण माहित नाही... आम्ही त्यांना पूर्णपणे.. ' असं म्हणताना राहुल यांचे शब्द अडखळले. सिंगापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात राहुल गांधींनी आपल्या भावना व्यक्त करताच उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांचा कडकडाट केला. राहुल यांनी आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव यांच्या हत्येचा उल्लेख केला. एखादी भूमिका घेतल्याबद्दल आपल्या कुटुंबाला किंमत चुकवावी लागेल, याची कल्पना होती, असं राहुल गांधी म्हणाले. 'राजकारणात तुम्ही चुकीच्या व्यक्तींशी पंगा घेतला आणि एखादी भूमिका घेतली, तर तुमचा जीव घेतला जातो.' असं राहुल म्हणाले. 'माझी आजी म्हणाली होती की तिचा मृत्यू होणार आणि माझ्या वडिलांना मी सांगितलं होतं की त्यांचा मृत्यू होणार.' असं राहुल गांधी यांनी सांगितलं. इंदिरा गांधी यांच्या सुरक्षारक्षकांनी 1984 मध्ये त्यांची हत्या केली होती. राजीव गांधी यांना श्रीलंकन तमिळ महिला सुसाईड बॉम्बरने उडवलं होतं. चेन्नईजवळच्या निवडणूक रॅलीत 1991 मध्ये ही घटना घडली होती. एलटीटीईने ही हत्या घडवून आणली होती. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी राजीव गांधींच्या सात मारेकऱ्यांची जन्मठेपेतून सुटका करण्याचा प्रस्ताव मांडला होता. काँग्रेसने याचा जोरदार विरोध केला होता, मात्र त्यावेळीही राहुल गांधी यांनी वैयक्तिक मत देणं टाळलं होतं. अशा घटनांमुळे मारेकऱ्यांमागील मानवी चेहरा पाहा, पण कोणाचा तिरस्कार करु नका, हे आम्ही शिकलो, असं राहुल गांधी म्हणाले. सकाळ-दुपार-संध्याकाळ आणि रात्री तुमच्याभोवती 15 जणांचा गराडा असतो, हा काही नेहरु-गांधी घराण्याचा वारस असल्याचा फायदा नाही, असं राहुल गांधी म्हणाले. घराणेशाहीच्या वादावर राहुल गांधींनी आपलं मत मांडलं. 'प्रभाकरनचा मृत्यू झाल्याचं 2009 मध्ये टीव्हीवर पाहिलं. तेव्हा दोन विचार मनात तरळले. हे अशाप्रकारे या माणसाला का त्रास देत आहेत. दुसरं म्हणजे त्याचे कुटुंबीय आणि पत्नीसाठी मला खूप वाईट वाटलं.' असं राहुल यांनी सांगितलं. 'प्रभाकरनने आपल्या बाबांना मारलं. त्याचा मृत्यू झाला, म्हणजे आपण आनंदी असायला हवं. आपण खुश का नाही' असं आपण बहिणीला म्हटल्याची आठवण राहुल गांधींनी सांगितली.

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
Embed widget