एक्स्प्लोर
...आणि तरुणाचा अजगरासोबतच्या सेल्फीचा प्लॅन फसला

जयपूर : सेल्फी कुठे, कधी, कशी घ्यायची याचं भानच नसलं की काय होतं याचा प्रत्यय राजस्थानमधील माऊंट अबू इथे आला. माऊंट अबूमध्ये अजगरासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न एका तरुणाला चांगलाच भोवला. अजगराने या अतिउत्साही तरुणाच्या खांद्याचा चावा घेतला.
माऊंट अबू इथे गावकऱ्यांनी मोठा अजगर पकडला होता. या अजगराला पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. अजगरामुळे जीव धोक्यात येऊ शकतो, हे माहित अजूनही काही जण त्याचे फोटो, व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न करत होते. त्यातच एका तरुणाने अजगराच्या जवळ जाऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सेल्फीत मग्न असलेल्या अजगराने तरुणाच्या खांद्याचा चावा घेतला.
अजगराच्या या हल्ल्यामुळे आजूबाजूचे सगळेच घाबरले आणि गोंधळ निर्माण झाला. या घटनेची दृश्ये कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement





















