एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'या देशावर जेव्हा एखाद्या राजपुत्राने राज्य केलंय...' विवेक ओबेरॉयचा राहुल गांधींना टोला
बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय हा शनिवारी दिल्लीमध्ये भाजपच्या प्रचार रॅलीत सहभागी झाला होता. यावेळी विवेक ओबेरॉयने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय हा शनिवारी दिल्लीमध्ये भाजपच्या प्रचार रॅलीत सहभागी झाला होता. यावेळी विवेक ओबेरॉयने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विवेक म्हणाला की, "जेव्हा जेव्हा या देशावर (भारतावर) एखाद्या राजपुत्राने किंवा विदेशी लोकांनी राज्य केले आहे, तेव्हा या लोकांनी केवळ या देशाला लुटले आहे."
बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय सध्या त्याचा आगामी 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तो सध्या या चित्रपटाचे प्रमोशनदेखील करतोय. याचदरम्यान काल तो भाजपच्या दिल्लीत इंडिया गेट येथे आयोजित 'सातों सीटें मोदी को' या कॅम्पेनमध्ये सहभागी झाल होता. यावेळी त्याने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला.
VIDEO | आचारसंहितेत 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपट प्रदर्शित झाल्यास मनसेचा खळखट्ट्याकचा इशारा | एबीपी माझा
विवेक ओबेरॉय म्हणाला की, "हिंदूस्तानचा इतिहास पाहा, जेव्हा जेव्हा या देशावर (भारतावर) एखाद्या राजपुत्राने किंवा विदेशी लोकांनी राज्य केले आहे, तेव्हा या लोकांनी केवळ या देशाला लुटले आहे. देशातील सर्व नागरिक हे देशाचे चौकीदार आहेत. हे चौकीदार यापुढे कोणालाही या देशाला लुटू देणार नाहीत. पंतप्रधान मोदींचा विजय निश्चित आहे. ते पंतप्रधान आहेत आणि राहतील. अब भारत लुटेगा नही, उठेगा."
Vivek Oberoi: Hindustan ka itihas hai, jab bhi is desh par kisi shehzade ne, kisi videshi ne raj kiya, is desh ko sirf loota. Sab nagrik, desh ke sab chowkidar, dobara Bharat ko lutne nahi denge. PM Modi ki jeet nishchit hai, wo PM hain aur rahenge. Ab Bharat lutega nahi, uthega. pic.twitter.com/i7FHAxDnP9
— ANI (@ANI) May 4, 2019
Delhi: Actor Vivek Oberoi joined BJP's 'Saaton Seetein Modi Ko' campaign at India Gate. Bengaluru South BJP candidate Tejasvi Surya and Kapil Mishra were also present. pic.twitter.com/uvCuxBPsnd
— ANI (@ANI) May 4, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई
Advertisement