एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चंद्रकांत दादांचं विधान हास्यास्पद, मी काँग्रेसचाच विचार घेऊन काम करणार : विश्वजीत कदम
चंद्रकांत पाटील आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनले आहेत. ते वरिष्ठ मंत्री आहेत. त्यांनी असं हास्यास्पद विधान का करावं? ते वारंवार असं विधान का करतात हे त्यांनाच माहिती आहे, असे ते म्हणाले.
नवी दिल्ली : काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक भाजपमध्ये आला तर कुणाला आश्चर्य वाटायला नको, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावर महाराष्ट्र काँग्रेस कार्याध्यक्ष विश्वजीत कदम यांनी चंद्रकांत पाटील यांचं हे विधान हास्यास्पद असल्याचं म्हटलं आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या विधानाबाबत कदम यांना विचारले असता ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनले आहेत. ते वरिष्ठ मंत्री आहेत. त्यांनी असं हास्यास्पद विधान का करावं?. ते वारंवार असं विधान का करतात हे त्यांनाच माहिती आहे, असे ते म्हणाले.
चंद्रकांत दादांनी त्यांची इच्छा वारंवार व्यक्त केली आहे. मात्र मी माझी भूमिका यापूर्वीही स्पष्ट केलेली आहे आणि यापुढे मला ती वारंवार स्पष्ट करावी असं वाटत नाही. पण पतंगराव कदम साहेबांनी 40 वर्ष काँग्रेसमध्ये काढली. यापुढेही मी काँग्रेस पक्षाचा विचार घेऊन महाराष्ट्रात काम करणार आहे. याबद्दल कोणाला शंका असण्याचं कारण नाही, असे कदम म्हणाले.
काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत आहे. जी नवीन टीम नेमण्यात आली आहे, ती चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात काम करेल. कार्याध्यक्षांच्या निवडीत प्रादेशिक संतुलन ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्येष्ठ आणि तरुण याचाही योग्य संगम घालण्यात आला आहे. एकदा नव्या टीमची जबाबदारी निश्चित झाली की आम्ही जबाबदारीनं आणि जोमाने काम करू, असे ते म्हणाले.
काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक भाजपमध्ये आला तर कोणाला आश्चर्य वाटायला नको : चंद्रकांत पाटील
काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक भाजपात आला तर कोणाला आश्चर्य वाटायला नको, अशी सूचक प्रतिक्रिया महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. भाजप प्रदेश कार्यालयात आज चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, मी याला पद नाही, जबाबदारी म्हणतो. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत युतीचे राज्य आणण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपला 51 टक्क्यांहून जास्त मतदान मिळालं. 227 च्या जागांमध्ये आम्ही पुढे आहोत. त्यात वाढ होईल पण कमी होणार नाही, असेही पाटील म्हणाले. येत्या निवडणुकीत विजयासाठी सहयोगी पक्षाला जिंकवणं तितकंच महत्वाचं आहे. निवडणूक होऊन निकाल लागणं ही फक्त औपचारिकता आहे. निकाल आजच लागला असल्याचेही ते म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
आयपीएल
Advertisement