एक्स्प्लोर

मोठी बातमी :  विनेश फोगाटची प्रकृती बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, डीहायड्रेशनचा त्रास

Vinesh Phogat Paris Olympics 2024 : विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली आहे. यानंतर विनेश फोगाटची प्रकृती बिघडली आहे. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.

Vinesh Phogat Paris Olympics 2024 : भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिने 50 किलो फ्रीस्टाइल गटात शानदार कामगिरी करताना अंतिम फेरी गाठली. मात्र, अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली आहे. यानंतर विनेश फोगाटची प्रकृती बिघडली आहे. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. डीहायड्रेशनचा त्रास होत अल्यामुळं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

विनेश फोगाटने क्युबाच्या युसनेलिस गुझमन लोपेझविरुद्ध 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला होता. विनेश फोगाट ऑलिम्पिक कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू, तर सुशील कुमारनंतरची पहिली भारतीय ठरली. मात्र अंतिम सामन्याआधी विनेश फोगाट अपात्र ठरली आहे. विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती.

विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरण्याचं कारण काय?

विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली आहे. विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे विनेश फोगाटला अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. परंतु तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आल्याचं सांगण्यात येत आहे. विनेश फोगाट रौप्य आणि कांस्य पदकासाठीही पात्र होणार नाही.

तपासणीवेळी विनेश फोगाटचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त

विनेश फोगाटचे वजन जास्त असल्याचे लक्षात आल्यानंतर मंगळवारी रात्रभर भारतीय पथकाकडून रात्रभर हालचाली सुरु होत्या. मात्र, बुधवारी सकाळी झालेल्या तपासणीवेळी विनेश फोगाटचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. यानंतर विनेश फोगाटकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. आता ऑलिम्पिकसाठी गेलेल्या भारतीय पथकाकडून उर्वरित सामन्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे.

विनेश फोगाटचे सासरे राजपाल राठी यांचे आरोप

विनेश फोगाटचे सासरे राजपाल राठी यांनी एबीपी न्यूजशी बातचित केली. ते म्हणाले की, 100 ग्रॅम वजन किती जास्त असतं? डोक्यावरच्या केसांमुळेही 100 ग्रॅम वजन वाढू शकतं. याशिवाय त्यांनी सरकार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रीजभूषण शरण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले. यात सरकार आणि ब्रीजभूषण शरण सिंह यांचा हात असल्याचंही ते म्हणाले आहेत. एबीपी न्यूजशी खास संवाद साधताना राजपाल राठी म्हणाले की, "ही हृदयद्रावक बातमी असून त्यावर राजकारण केलं जात आहे. हे एक मोठं षडयंत्र आहे. यात सरकारचा हात आहे. 100 ग्रॅम वजनामुळे कोण बाहेर काढतं? डोक्यावरच्या केसांमुळेही 100 ग्रॅमपर्यंत वजन वाढतं. सपोर्ट स्टाफनं कोणत्याही प्रकारची मदत केलेली नाही. 

महत्वाच्या बातम्या:

Vinesh Phogat: विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र; भारताला मोठा धक्का, एका रात्रीत काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime : बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या, मस्साजोगमध्ये रास्ता रोको सुरूच
बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या, मस्साजोगमध्ये रास्ता रोको सुरूच
Satish Wagh Case: काळ्या मातीत राबणारा अन् हॉटेल व्यावसायिक, सतीश वाघ कोणाच्या डोळ्यात सलत होते? नेमकं कारण काय?
काळ्या मातीत राबणारा अन् हॉटेल व्यावसायिक, सतीश वाघ कोणाच्या डोळ्यात सलत होते? नेमकं कारण काय?
मामाचा खून, मुख्यमंत्र्यांचा फोन; स्मशानातूनच आमदार टिळेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच सांगितलं
मामाचा खून, मुख्यमंत्र्यांचा फोन; स्मशानातूनच आमदार टिळेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच सांगितलं
Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीने डायरेक्ट स्वतःचं वजनचं सांगितलं, म्हणाली..
अभिनेत्री प्राजक्ता माळीने डायरेक्ट स्वतःचं वजनचं सांगितलं, म्हणाली..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ram Satpute speech Markadwadi:मोहिते पाटलांना वर्षभरात जेलमध्ये टाकू,मारकडवाडीतील सर्वात आक्रमक भाषणMarkadwadi Banner : मारकडवाडी गावात शरद पवार गट आणि भाजपची मोठी बॅनरबाजीABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 10 December 2024Kurla Bus Accident : कुर्ल्यात बेस्ट बस अपघात प्रकरण;आरोपीचं कुटुंब ABP Majhaवर Exclusive

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime : बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या, मस्साजोगमध्ये रास्ता रोको सुरूच
बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या, मस्साजोगमध्ये रास्ता रोको सुरूच
Satish Wagh Case: काळ्या मातीत राबणारा अन् हॉटेल व्यावसायिक, सतीश वाघ कोणाच्या डोळ्यात सलत होते? नेमकं कारण काय?
काळ्या मातीत राबणारा अन् हॉटेल व्यावसायिक, सतीश वाघ कोणाच्या डोळ्यात सलत होते? नेमकं कारण काय?
मामाचा खून, मुख्यमंत्र्यांचा फोन; स्मशानातूनच आमदार टिळेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच सांगितलं
मामाचा खून, मुख्यमंत्र्यांचा फोन; स्मशानातूनच आमदार टिळेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच सांगितलं
Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीने डायरेक्ट स्वतःचं वजनचं सांगितलं, म्हणाली..
अभिनेत्री प्राजक्ता माळीने डायरेक्ट स्वतःचं वजनचं सांगितलं, म्हणाली..
धमकी देणाऱ्यांना भर चौकात नागडं करुन मारु, मोहिते पाटलांना वर्षभरात जेलमध्ये टाकू, राम सातपुतेंचं आव्हान
धमकी देणाऱ्यांना भर चौकात नागडं करुन मारु, मोहिते पाटलांना वर्षभरात जेलमध्ये टाकू, राम सातपुतेंचं आव्हान
Markadwadi Banner : मारकडवाडी गावात शरद पवार गट आणि भाजपची मोठी बॅनरबाजी
Markadwadi Banner : मारकडवाडी गावात शरद पवार गट आणि भाजपची मोठी बॅनरबाजी
Ramgiri Maharaj : सनातनी जागे झाले तर जगात उलथापालथ करतील, अमेरिकेचा अध्यक्ष आम्ही निवडू; हिंदू मोर्चातून रामगिरी महाराजांचा हल्लाबोल
सनातनी जागे झाले तर जगात उलथापालथ करतील, अमेरिकेचा अध्यक्ष आम्ही निवडू; हिंदू मोर्चातून रामगिरी महाराजांचा हल्लाबोल
Adani Meets Devendra Fadnavis: उद्योगपती गौतम अदानी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी बातमी: उद्योगपती गौतम अदानी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Embed widget