एक्स्प्लोर
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने हरियाणात गाव!
चंदीगड : हरियाणाच्या मेवात जिल्ह्याचा विकास मंदावलेला असला तरीही एका गावाची व्यवस्था लवकरच बदलणार आहे. अमेरिकेत सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक वीरेंद्र पाठक यांनी एका गावाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव देण्याची घोषणा केली आहे.
भारत आणि अमेरिकेचे संबंध यामुळे आणखी घनिष्ट होतील, असं वॉशिंग्टनमध्ये झालेल्या कार्यक्रमात सुलभचे संस्थापक वीरेंद्र पाठक यांनी सांगितलं. तर मेवात जिल्ह्यातील धांदुका गावातील ग्रामस्थांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव गावाला मिळणार असल्यामुळे मोठा उत्साह आहे.
सुलभ इंटरनॅशनलने अगोदरच गावाचा मोठा विकास केला आहे. गावातील सर्व घरांना शौचालयं देऊन सुलभने मेवातसारख्या मागसलेल्या जिल्ह्यात एक आदर्श निर्माण केला आहे, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement