एक्स्प्लोर

Vice President Election 2022 : मार्गारेट अल्वा की जगदीप धनखड? उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आज, कोणाचं पारडं जड?

Vice President Election 2022 : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएचे उमेदवार आणि माजी राज्यपाल जगदीप धनखड आहेत, तर काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा विरोधी पक्षाच्या उमेदवार आहेत.

Vice President Election 2022 : देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक (Vice President Election) होणार आहे. निवडणुकीचे निकालही आजच सायंकाळपर्यंत जाहीर होतील. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे (NDA) उमेदवार माजी राज्यपाल जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) आहेत. त्याचवेळी विरोधकांनी काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा (Margaret Alva) यांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपत आहे. यावेळी निवडणुकीबाबत काय समीकरणं बनवली जातात, कोणाचं पारडं जड, जाणून घ्या उपराष्ट्रपती निवडणुकीशी संबंधित गोष्टी...

संसद भवनात सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. त्यानंतर लगेचच मतमोजणी होणार असून संध्याकाळी उशिरापर्यंत देशाच्या नव्या उपराष्ट्रपतींच्या नावाची घोषणा निवडणूक अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. नवे उपराष्ट्रपती 11 ऑगस्ट रोजी शपथ घेतील. 

निवडणूक गुप्त मतदानाने घेतली जाते. या प्रणालीमध्ये मतदाराला उमेदवारांच्या नावासमोर पसंती दर्शवावी लागते. मतदारांनी निष्ठेने मतदानाची गुप्तता पाळणे अपेक्षित आहे. या निवडणुकीत खुल्या मतदानाची संकल्पना नसून अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत कोणालाही मतपत्रिका दाखवण्यास सक्त मनाई आहे. या प्रणालीमध्ये, मतदाराला उमेदवारांच्या नावासमोर प्राधान्य चिन्हांकित करावं लागणार आहे. या निवडणुकीत खुल्या मतदानाची संकल्पना नसून अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत कोणालाही मतपत्रिका दाखवण्यास सक्त मनाई आहे.

लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व सदस्यांचा उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉल कॉलेजमध्ये समावेश केला जातो. नामनिर्देशित सदस्यही यामध्ये मतदान करण्यास पात्र असतात. संसदेचे सध्याचे संख्याबळ 788 आहे, जिंकण्यासाठी 390 पेक्षा जास्त मतांची आवश्यकता आहे.

लोकसभेत भाजपचे एकूण 303 आहेत. खासदार संजय धोत्रे प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकणार नाहीत. अशा प्रकारे लोकसभेत एनडीएचे एकूण 336 सदस्य आहेत. तसेच, राज्यसभेत भाजपचे 91 (4 नामनिर्देशित सदस्यांसह) सदस्य आहेत आणि एनडीएचे एकूण 109 सदस्य आहेत. अशा परिस्थितीत आता एनडीएचे दोन्ही सभागृहात एकूण 445 सदस्य आहेत.

एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांना YSRCP, BSP, TDP, BJD, AIADMK, शिवसेना इत्यादी विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. इलेक्टोरल कॉलेजच्या आकडेवारीनुसार, धनखड यांच्या बाजूनं दोन तृतीयांश मतं आहेत. आकडेवारीचा विचार करता धनखड यांचा विजय निश्चित वाटतो.

जगदीप धनखड यांना जवळपास 515 मतं मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, अल्वा यांना आतापर्यंत मिळालेला पक्षांचा पाठिंबा लक्षात घेता त्यांना जवळपास 200 मतं मिळतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसनं अल्वा यांच्या नावाच्या घोषणेपूर्वी एकमत न होण्याच्या प्रयत्नांचा हवाला देत मतदान प्रक्रियेपासून दूर राहण्याची घोषणा केल्यानं उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून विरोधी पक्षांमध्येही मतभेद निर्माण झाले आहेत.

जगदीप धनखड हे 71 वर्षांचे असून ते राजस्थानमधील प्रभावशाली जाट समाजातील आहेत. त्यांची पार्श्वभूमी समाजवादी आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार होण्यापूर्वी ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते.

धनखड यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाली, तर लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे अध्यक्ष एकाच राज्याचे असतील, हा योगायोग म्हणावा लागेल. सध्या ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत आणि ते राजस्थानच्या कोटा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष देखील असतात. 

मार्गारेट अल्वा या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या असून त्यांनी राजस्थानच्या राज्यपाल म्हणूनही काम पाहिलं आहे. तेलंगना राष्ट्र समिती (TRS), आम आदमी पार्टी (AAP) आणि झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) यांनी अल्वा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) नेही अल्वा यांना पाठिंबा दिला आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलंChhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget