Radhika Merchant : अंबानींची होणारी सून राधिका मर्चंटच्या अरंगेत्रम सोहळ्याला दिग्गजांची हजेरी
Radhika Merchant : अंबानींच्या होणाऱ्या सुनेचा राधिका मर्चंटचा अरंगेत्रम सोहळा नुकताच जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडला आहे.
Radhika Merchant : अंबानींच्या होणाऱ्या सुनेचा, नृत्यांगना राधिका मर्चंटचा (Radhika Merchant) अरंगेत्रम (Arangetram Ceremony) सोहळा नुकताच पार पडला आहे. जिओ वर्ल्ड सेंटरच्या ग्रँड थिएटरमध्ये (Jio World Center Grand Theatre) हा सोहळा पार पडला आहे. या सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे.
राधिका मर्चंट ही मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नात आपल्या नृत्यविष्काराने चर्चेत आली होती. राधिका एक लोकप्रिय भरतनाट्यम नृत्यांगना आहे. आता राधिकाला अरंगेत्रम ही पदवी मिळाली आहे. अरंगेत्रम सोहळ्याला सलमान खान, आमिर खान, रणवीर सिंहसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब या कार्यक्रमात उपस्थित होते.
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीसोबत राधिका लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. राधिका मर्चंटच्या अरंगेत्रम सोहळ्याला अंबानी आणि मर्चंट कुटुंबियांसह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे.
पारंपारिक पेहरावात मान्यवरांनी लावली हजेरी
अरंगेत्रम सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी पारंपारिक पेहरावात हजेरी लावली होती. महिलांनी ब्रोकेडेड आणि सिल्कच्या साड्या नेसल्या होत्या. तर पुरुष मंडळी शेरवानी आणि कुर्त्यामध्ये दिसून आले. अंबानी आणि मर्चंट कुटुंबियांनी पाहुण्याचे जोरदार स्वागत केले. अरंगेत्रम सोहळ्यात सर्व कोरोना संबंधित नियमांचे पालन करण्यात आले होते. कार्यक्रमात सहभागी होण्याआधी मान्यवरांची कोरोना टेस्ट करण्यात आली. अरंगेत्रम सोहळ्याला सर्व प्रकारची सुरक्षिततेचे पालन करण्यात आले.
राधिका मर्चंटच्या नृत्याविष्काराने प्रेक्षकांना केले घायाळ
राधिका मर्चंटने तिच्या नृत्याविष्काराने प्रेक्षकांना घायाळ केले. गेल्या आठ वर्षांपासून राधिकाने गुरु सुश्री भावना ठाकर यांच्याकडून नृत्याचे धडे गिरवले आहेत. अरंगेत्रम म्हणजे भरतनाट्यम या नृत्यप्रकारात वर्षानुवर्ष शिक्षण घेतल्यानंतर रंगमंचासमोर आपल्या गुरुसमोर आपले नृत्य सादर करणे. त्यामुळे राधिकाने गुरु सुश्री भावना ठाकर यांच्यासमोर नृत्याविष्कार सादर केला.
अंबानी घराण्यातली राधिका दुसरी नृत्यांगना
नीता अंबानी नंतर राधिका अंबानी घराण्यातली दुसरी नृत्यांगना आहे. नीता अंबानी यांनीदेखील भरतनाट्यमचे शिक्षण घेतले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी भरतनाट्यम नृत्याविष्कार सादर केला आहे. राधिकाच्या नृत्यप्रकारात अरंगेत्रमच्या अनेक पारंपारिक घटकांचा समावेश आहे. कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांनी टाळ्यांच्या कडकडाटात राधिकावर अभिनंदनाचा वर्षाव केला.
संबंधित बातम्या