एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एअर इंडियावर व्यंकय्या नायडू भडकले
मुंबई : एअर इंडियाच्या गलथानपणावर मंगळवारी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू कमालीचे भडकले. नायडू मंगळवारी हैदराबाद ते नवी दिल्लीदरम्यान एअर इंडियाच्या फ्लाइटने प्रवास करीत होते. मात्र, या फ्लाइटचा पायलट वेळेवर न पोहोचल्याने ही फ्लाइट रद्द करावी लागली, त्यामुळे व्यंकय्या नायडूंना घरी परतावे लागले. यावर व्यंकय्या कमालीचे भडकले, आणि त्यांनी आपली नाराजी ट्विटरवरून व्यक्त केली.
नायडूंनी केलेल्या ट्विटनुसार, त्यांना एअर इंडियाच्या AI544 या फ्लाइटने हैदराबाद ते नवी दिल्ली असा प्रवास करायचा होता. या फ्लाइटला 1 वाजून 15 मिनीटांनी उड्डाण करायचे होते. त्यानुसार ते 12वा. 30 मिनीटांनी विमानतळावर पोहोचले. मात्र, 1 वाजून 15 मिनीटांनी या विमानाचा वैमानिक वेळेवर न आल्याने फ्लाइट उशीरा असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी 1 वा. 45 मिनीटांपर्यंत विमानतळावरच वाट पाहिली. मात्र, तरीही बोर्डिंग सुरु न झाल्याने त्यांना घरी परतावे लागले.
https://twitter.com/MVenkaiahNaidu/status/747731781911220224
https://twitter.com/MVenkaiahNaidu/status/747732678426923008
https://twitter.com/MVenkaiahNaidu/status/747732876649693184
https://twitter.com/MVenkaiahNaidu/status/747732927488925696
नायडूंनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करून एअर इंडियाला यासंबंधी स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. तसेच याप्रकारामुळे त्यांना एक महत्त्वाची बैठक रद्द करावी लागल्याचेही त्यांनी ट्विटरवरून सांगितले.
https://twitter.com/airindiain/status/747752302811832321
दरम्यान, यानंतर एअर इंडिया प्रशासनाने व्यंकय्यांची ट्विटरवरूनच माफी मागितली असून या विमानाचा वैमानिक ट्राफिकमध्ये अडकल्याने वेळेत पोहचू शकला नसल्याचे सांगितले आहे. तसेच या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असल्याचे सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement