एक्स्प्लोर

वर्षभरात भाज्यांचे भाव दुप्पट! एका किलोच्या किंमतीत आता पाव किलोच भाजी 

Vegetable Prices : कांदा, बटाटा आणि इतर बहुतांश भाज्यांचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाले आहेत. वाढते इंधनदर हेच यामागे कारण असल्याचं सांगितलं जातंय. 

नवी दिल्ली: गेल्या वर्षभरात भाज्यांचे दर हे बुलेट ट्रेनच्या वेगापेक्षा जास्त वेगाने वाढले आहेत असंच म्हणावं लागेल. याचा फटका शेतकरी, ग्राहक, भाजी विक्रेते, वाहतूकदार अशा सगळ्या घटकांवर होतो आहे. कारण भाजी महाग झाल्याने लोक कमी प्रमाणात भाजी खरेदी करत आहे. परिणामी मागणी, पुरवठा या सगळ्यावर परिणाम जाणवतो आहे. 

जर आपल्या खिसा आणि खर्च, याला जोडून जर सरकारी आकडेवारीवर नजर टाकली तर बहुतांश भाज्यांचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाले आहेत. फक्त टोमॅटोबद्दल बोलायचे झाले तर, सध्या दिल्लीत 39 रुपये किलोने विकले जातो आहे, तर एक वर्षापूर्वी त्याची किंमत 15 रुपये होती. 

राजधानी वगळता इतर शहरांमध्ये टोमॅटो अनेक पटींनी महाग झाला आहे. मुंबईत टोमॅटोची किंमत 77 रुपये प्रति किलो आहे, जी गेल्या वर्षी 28 रुपये होती. कोलकात्यातही गेल्या वर्षी 38 रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो आता ७७ रुपयांवर पोहोचला आहे. रांचीमध्येही त्याची किंमत ५० रुपये किलो आहे, जी गेल्या वर्षी 20 रुपयांना विकला जात होता.

उत्पादन राज्यांकडून पुरवठ्यावर परिणाम
टोमॅटोचे भाव वाढण्याचे कारण म्हणजे त्याचा पुरवठा करणाऱ्या राज्यातून इतर ठिकाणी पुरवठा होतो आहे असं मंडईतील व्यापाऱ्यांनी सांगितलं. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ही टोमॅटो उत्पादनाची प्रमुख राज्ये आहेत. जिथून त्याच्या पुरवठ्यात अडथळे येतात. केवळ टोमॅटोच नाही तर इतर भाज्यांचे दरही प्रचंड वाढले आहेत.

गेल्या वर्षी दिल्लीत बटाट्याचा भाव 20 रुपये किलो होता, तो आता 22 रुपयांनी विकला जातो आहे. मुंबईत गतवर्षी 21 रुपये किलोने विकले जाणारे बटाटे आता 27 रुपयांनी विकले जात आहेत. कोलकात्यातही बटाटे गेल्या वर्षी 16 रुपयांवरून 27 रुपये किलो झाले आहेत. रांचीमध्येही त्याची किंमत एका वर्षात 17 ते 20 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे.

कांद्याच्या किंमतीतही घट
अनेकदा ग्राहकांच्या डोळ्यात अश्रू आणणाऱ्या कांद्याने शेतकऱ्यांच्या रडवलं आहे. दिल्लीत कांद्याचा भाव गेल्या वर्षी 28 रुपयांवरून 24 रुपयांवर आला आहे. मुंबईतही 25 रुपयांवरून 18 रुपयांवर, कोलकात्यात 27 रुपयांवरून 23 रुपयांवर आणि रांचीमध्ये 25 रुपयांवरून 18 रुपयांवर प्रतिकिलो कांदा विकला जात आहे. ही आकडेवारी ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जाहीर केली आहे.

सर्वात मोठे कारण-  महाग तेल
भाज्यांच्या किमती वाढण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे महागडे इंधन आहे असं एमके ग्लोबल फायनान्स सर्व्हिसेसच्या चीफ इकॉनॉमिस्ट माधवी याचं म्हणणं आहे. डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे भाजीपाल्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली असून, त्यामुळे किरकोळ विक्रीच्या दरात वाढ झाली आहे. ऊर्जा क्षेत्रातील महागाई एप्रिलमध्ये 10.80 टक्‍क्‍यांवर पोहोचली आहे, जी महिन्यापूर्वी 3.5 टक्‍क्‍यांवर होती. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या महागाईचा दरही 1.6 टक्क्यांवरून 8.4 टक्क्यांवर पोहोचला आहे.

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
सरकार घाबरलंय, आंदोलन शक्तीशाली! 40 हजार निमलष्करी जवान तैनात करावे लागले, प्रशांत किशोरांचं मोठं वक्तव्य 
सरकार घाबरलंय, आंदोलन शक्तीशाली! 40 हजार निमलष्करी जवान तैनात करावे लागले, प्रशांत किशोरांचं मोठं वक्तव्य 
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget