Maharashtra Vacant Traffic Posts : महाराष्ट्रात वाहतूक पोलिसांच्या 4,675 जागा रिक्त, देशातील स्थिती काय?
Vacant Traffic Posts and Traffic Violations in India : भारतात रस्ते अपघातांचं प्रमाण जास्त आहे. त्याशिवाय येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही पाहायला मिळते.
Vacant Traffic Posts and Traffic Violations in India : भारतात रस्ते अपघातांचं प्रमाण जास्त आहे. त्याशिवाय येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही पाहायला मिळते. वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन, ओव्हरस्पीड असो अथवा रस्त्याची दुरावस्था अशा अनेक कारणांमुळे वाहतूक कोंडी झालेली दिसून येते. पण यामागे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे, भारतामध्ये वाहतूक पोलिसांच्या जागा रिक्त आहेत. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र अथवा इतर अनेक राज्यात वाहतूक पोलिसांच्या जागा रिक्त आहेत.
ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या 2021 च्या अहवालानुसार, देशात तब्बल 29 टक्के वाहतूक पोलिसांच्या जागा रिक्त आहेत. देशभरात वाहतूक पोलिसांच्या जागा 1 एक लाख 02 हजार 929 इतक्या आहेत. यापैकी देशभरात सध्या 73,287 वाहतूक पोलिस तैणात आहेत. तर 29,642 जागा रिक्त आहेत. म्हणजेच, देशभरात वाहतूक पोलिसांच्या 29 टक्के जागा रिक्त आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील प्रमाण 33% इतके आहे.
ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या 2021 च्या अहवालानुसार, देशभरात पश्चिम बंगालमध्ये वाहतूक पोलिसांमध्ये सर्वाधिक कमतरता आहे. पश्चिम बंगालमध्ये तब्बल 51 टक्के जागा रिक्त आहेत. तर गुजरात 49, मध्य प्रदेश 44 आणि महाराष्ट्रात 33 टक्के जागा रिक्त आहेत. महाराष्ट्रात वाहतूक पोलिसांच्या एकूण जागा 14,290 इतक्या आहेत. यापैकी 9,615 पोलिस तैणात आहेत. तर 4,675 जागा अद्याप रिक्त आहेत.
कोणत्या राज्यात वाहतूक पोलिसांच्या किती जागा रिक्त?
राज्य |
मर्यादा |
सध्या तैणात किती? |
रिक्त जागा |
रिक्त जागांचं प्रमाण % |
14,290 |
9,615 |
4,675 |
33% |
|
पश्चिम बंगाल |
12,006 |
5,911 |
6,095 |
51% |
कर्नाटक |
8,849 |
7,486 |
1,363 |
15% |
तामिळनाडू |
8,655 |
6,882 |
1,773 |
20% |
गुजरात |
7,513 |
3,869 |
3,644 |
49% |
राजस्थान |
6,713 |
3,811 |
2,902 |
43% |
दिल्ली |
6,006 |
5,312 |
694 |
12% |
मध्य प्रदेश |
5,518 |
3,094 |
2,424 |
44% |
राज्यातील एकूण संख्या |
1,02,929 |
73,287 |
29,642 |
29% |
भारतात वाहतूक नियमांचं उल्लंघन कसे केले जाते -
ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या अहवालानुसार, वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यामुळे भारतात 2020 मध्ये तब्बल 3.66 लाख अपघात झाले आहेत. यामध्ये 1.31 लाख लोकांचा मृत्यू झालाय. वाहन चालवताना भारतामध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याचं अनेकदा दिसून येते. यामध्ये वेगमर्यादा ओलांडणे, दारु पिऊन/ड्रग्स सेवन करुन वाहन चालवणे, चुकीच्या बाजूने गाडी चालवणे, सिग्नल तोडणे, मोबाईलचा वापर करणे, यासह इतर वाहतूक नियमांचं उल्लंघन करणे, याचा समावेश आहे.
2020 मध्ये देशात कशामुळे रस्ते अपघात झाले? किती जणांचा मृत्यू झाला?
वाहतूक नियमांचं उल्लंघन |
अपघाताची एकूण संख्या |
मृत्यू |
जखमी |
वेगमर्यादा ओलांडणे ( Over-Speeding) |
2,65,343 |
91,239 |
2,55,663 |
दारु पिऊन गाडी चालवणे (Drunken Driving) |
8,355 |
3,322 |
7,845 |
चुकीच्या बाजूने गाडी चालवणे (Driving on wrong side) |
20,228 |
7,332 |
19,481 |
सिग्नल तोडणे (Jumping Red Light) |
2,721 |
864 |
2,688 |
मोबाईल फोनचा वापर करणे (Use of Mobile Phone) |
6,753 |
2,917 |
5,975 |
इतर |
62,738 |
26,040 |
56,627 |
एकूण |
3,66,138 |
1,31,714 |
3,48,279 |
Source: Road Accidents in India – 2020