एक्स्प्लोर
पी व्ही सिंधूला भारदस्त बीएमडब्ल्यू, सचिनच्या हस्ते वितरण
हैदराबाद : रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकलेल्या पी.व्ही.सिंधूला, मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते बीएमडब्ल्यू भेट देण्यात येणार आहे. सचिन येत्या 28 ऑगस्टला या गाडीची चावी सिंधूच्या हाती देईल.
हैदराबाद जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष व्ही चामुंडेश्वर यांनी ही कार सिंधूला भेट दिली आहे. त्याच वितरण सचिनच्या हस्ते होणार आहे.
यापूर्वी चामुंडेश्वर यांनीच लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलेल्या बॅडमिंटनपटू सायना नेहवालला बीएमडब्ल्यू भेट दिली होती. ती कारही सचिनच्या हस्तेच वितरित करण्यात आली होती.
याशिवाय 'एशिअन यूथ अंडर 19 चॅम्पियनशीप 2012' जिंकणाऱ्या सिंधूला सचिनच्या हस्ते मारूती स्विफ्ट भेट दिली होती.
"आंध्र प्रदेश आणि तेलंगाणामधील कोणत्याही खेळाडूने पदक जिंकल्यास त्याला बीएमडब्ल्यू भेट देणार असल्याचं मी रिओ ऑलिम्पिक सुरु होण्यापूर्वीच सांगितलं होतं. मला आनंद होतोय की ही कार पी व्ही सिंधूला मिळणार आहे". असं चामुंडेश्वर म्हणाले.
"सचिन तेंडुलकर हैदराबादमध्ये 28 ऑगस्ट रोजी बीएमडब्ल्यू कार सिंधूला भेट देणार आहे. याबद्दलचं वेळापत्रक आणि स्थळ लवकरच जाहिर करण्यात येणार आहे." असं हैदराबाद बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व्ही. चामुंडेश्वरनाथ यांनी सांगितलं.
'रौप्य'राणी पी व्ही सिंधूला कोणी काय दिलं?
*तेलंगाणा सरकारकडून एक कोटी रुपयांचं इनाम आणि भूखंड
*दिल्ली सरकार 2 कोटी रुपये
*मध्य प्रदेश सरकारकडून 50 लाख रुपये
*भारतीय बॅडमिंटन असोसिएशनकडून 50 लाख रुपये
*भारतीय फुटबॉल फेडरेशनकडून 5 लाख रुपये
*हरियाणा सरकारकडून
* महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीकडून सिंधूला तिच्या आवडीची कार
*सलमान खानकडून 1 लाख रुपये (ऑलिम्पिकमधील प्रत्येक भारतीय खेळाडूला)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement