Uttarakhand Cloudburst : कोरोनाचं वादळ शमत नाही तोच उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा ढगफुटी; इमारत जमीनदोस्त
कोरोना संकटाशी दोन हात करत असतानाच उत्तराखंडमध्ये आरोग्य सुविधांचा जाणावरा तुटवडा प्रशासनापुढे आव्हानाची परिस्थिती उभा करुन गेला.

Uttarakhand Cloudburst : कोरोना संकटाशी दोन हात करत असतानाच उत्तराखंडमध्ये आरोग्य सुविधांचा जाणावरा तुटवडा प्रशासनापुढे आव्हानाची परिस्थिती उभा करुन गेला. त्यातच आता आणखी एक संकट इथं धडकलं आहे. हे संकट आहे ढगफुटीचं. उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा मंगळवारी ढगफुटी झाल्याचं निदर्शनास आलं. देवप्रयाग येथे झालेल्या या ढगफुटीसदृश पावसामुळं इमारती जमीनदोस्त झाली.
पावसामुळं पाण्याचा प्रवाह वाढला आणि या शक्तिशाली प्रवाहामुळं काही इमारती, घरं, दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. उत्तराखंडमधील नगरपालिकेचं बहुउद्देशीय भवन आणि आयटीआयची इमारत या ढगफुटीमुळं जमीनदोस्त झाली. उत्तराखंडमधील टेहरी गढवाल जिल्ह्यात असणाऱ्या देवप्रयाग मार्केट परिसरात यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.
मुख्यमंत्री तिर्थ सिंह रावत यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. सदर घटनेनंतर त्यांनी तातडीने माहिती मागवली असून, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुढाकार घेतला. देवप्रयाग पोलिस स्थानकातील अधिकारी महिपाल सिंह रावत यांनी दिलल्या माहितीनुसार या भागातील बरीच दुकानं बंद होती. कोरोना काळातील संचारबंदीमुळं इथं नागरिकांची वर्दळही कमीच होती. तरीही, आपत्तीचं गांभीर्य पाहता इथं शोधमोहिमही राबवण्यात आली होती.
In a time when We're crippling due to #COVID19, the incident of #cloudburst taking place at Devprayag is extremely disturbing & concerning.
— Madhumati Agrawal (@Madhu_Agrawal_) May 12, 2021
I express my Solidarity with the people of #Uttarakhand in these upsetting times & pray for their well-being. #UttarakhandCloudBurst pic.twitter.com/iDSbEf0SER
जिल्हा व्यवस्थापनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देवप्रयागमधील उंचावर असणाऱ्या भागामध्ये सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही ढगफुटीची घटना घडली. ज्यामुळं गडेरा या नदीप्रवाहात पाण्याची पातळी अचानकच वाढली. या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळं वाटेत आलेल्या इमातींचं नुकसान झालं आणि हा मातीचा लोट अलखनंदा नदीत मिसळला गेला.























