Uttarakhand Accident : उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, वऱ्हाड घेऊन जाणारी बस 500 मीटर दरीत कोसळली, 25 जणांचा मृत्यू
उत्तराखंडच्या (Uttarakhand) पौरी गढवाल (Pauri Garhwal) जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये 25 जणांचा मृत्यू (25 Death) झाल्याचे वृत्त आहे.
Pauri Accident : उत्तराखंडच्या (Uttarakhand) पौरी गढवाल (Pauri Garhwal) जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. बस 500 मीटर खोल दरीत कोसळली असून, यामध्ये 25 जणांचा मृत्यू (25 Death) झाल्याचे वृत्त आहे. या बसमध्ये 45 ते 50 लोक होते. हे सर्व लोक एका लग्नासाठी जात होते. त्यावेळी पौरी गढवालच्या बिरखल भागात हा अपघात घडला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफची (SDRF) चार पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. बचावकार्य सुरु असून, आत्तापर्यंत 21 जणांना वाचवण्यात यश आलं आहे.
21 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश
उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे. पौरी गढवालच्या बिरखल भागात मंगळारी रात्री झालेल्या बस अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस आणि एसडीआरएफने 21 जणांची सुटका केली आहे. दरम्यान, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हरिद्वार शहराचे एसपी स्वतंत्र कुमार सिंह यांनी रात्री उशिरा बस अपघाताची माहिती दिली. लालधंग येथून ही बस निघाली होती. वाटेतच या बसचा अपघात झाला.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडून शोक व्यक्त
दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेची माहिती घेतली आहे. पुष्कर सिंह धामी यांनी ट्विट करून या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. या अपघाताविषयी अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेण्यात आली असल्याचे धामी म्हणाले. वऱ्हाड घेऊन जाणारी बस 500 मीटर खोल दरीत कोसळल्यानं 25 जांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये 10 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, घटनास्थळी मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. राज्य आपत्ती निवारण दलाचे (SDRF) एक पथक मदतकार्यासाठी रवाना करण्यात आले आहे.
जखमींवर उपचार सुरु
अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना प्राथमिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बस कोटद्वारकडून कांडाकडे जात होती. रिखनीखेल-बिराखल मार्गावरील सिमडी गावाजवळ हा अपघात झाला. दरम्यान, मदतकार्यात ग्रामस्थही सहभागी झाले होते. याशिवाय स्थानिक प्रशासनही घटनास्थळी पोहोचले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी सध्या सचिवालयातील आपत्ती नियंत्रण कक्षात आहेत. ते या बस अपघाताची माहिती घेत आहेत. त्यांनी आजचे सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: