एक्स्प्लोर

रामायणातल्या संजीवनी बुटीसाठी उत्तराखंड सरकारकडून समिती स्थापन

नवी दिल्ली: रामायणामध्ये ज्या संजीवनी बुटीने दशरथ पुत्र लक्ष्मणाला नवजीवन दिले होते, त्याच्या शोधासाठी उत्तराखंडाच्या हरिश रावत सरकारने समिती स्थापन केली आहे. त्यामुळे या बुटीचा शोध आता लवकरच लागणार आहे.   त्रेतायुगातील राम-रावण यांच्यातील युद्धामध्ये मेघनादने आपल्या शक्तींनी लक्ष्मणाला मुर्छित केले होते. तेव्हा त्यांना वाचवण्यासाठी वैद्यांनी हिमालयातील संजीवनी बुटी आणण्याचा सल्ला दिला. संजीवनी बुटी आणण्यासाठी पवनपुत्र हनुमानाला हिमालयात पाठवण्यात आले. मात्र, हिमालयात त्याची ओळख हनुमंतांना न पटल्याने त्यांनी थेट द्रोणागिरीच उचलून आणला, आणि लक्ष्मणाचे प्राण वाचवले.   आयूष विभाग घेणार शोध उत्तराखंडमधील आयूष विभागाने आयुर्वेदीक तज्ज्ञांची समिती स्थापन केली असून ही समिती लवकरच द्रोणागिरीच्या खोऱ्यात पोहचून या बुटीचा शोध घेणार आहेत. उत्तराखंड सरकारमधील आयूषमंत्री सुरेंद्र सिंह नेगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या समितीमध्ये एकूण चार सदस्य असणार असून, पुढील महिन्यापासून ही कमेटी आपले काम सुरु करणार आहेत.   आयुर्वेदीक उत्पादनांची मोठी मागणी   जगभरात सध्या आयुर्वेदीक उत्पादनांची मोठी मागणी असून, दिवसेंदिवस या उद्योगाला मोठी बाजारपेठ मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर अशा एखाद्या चमत्कारिक बुटीचा शोध लागल्यास या उद्योगाला मोठी दिशा मिळणार आहे.   या शोधासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली होती. मात्र, केंद्राने यास नकार दिल्याने उत्तराखंड सरकारने स्वत:च यासाठी पुढाकार घेतला आहे.   जंगलातील वणव्याने अनेक औषधी वनस्पती नष्ट   उत्तराखंड देशातील सर्वात जास्त आयुर्वेदीक वनस्पती मिळणारे राज्य आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत या भागातील जंगलात लागलेल्या वणव्याने अनेक दुर्लभ औषधी वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे अतिशय दुर्मिळ असणारी ही वनस्पती देखील लुप्त झाल्याचे मानले जात आहे.   संजीवनी बुटीला शोधून काढणे हे अतिशय अवघड काम असल्याचे स्वत: आयूष मंत्री नेगी यांनी म्हणले आहे. पण तरीही राज्य सरकारने यासाठी 25 कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Rain Updates: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील तीन-चार तास मुसळधार पावसाचा इशारा, दीड वाजता समुद्रात मोठी भरती
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील तीन-चार तास मुसळधार पावसाचा इशारा, दीड वाजता समुद्रात मोठी भरती
Actresses Who Married Businessman : कोणी 7200 कोटी, कोणी 4000 कोटींचा मालक; 'या' बॉलिवूड अभिनेत्रींचे पती आहेत खूपच श्रीमंत
कोणी 7200 कोटी, कोणी 4000 कोटींचा मालक; 'या' बॉलिवूड अभिनेत्रींचे पती आहेत खूपच श्रीमंत
Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ, लाईफलाईन ठप्प, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी
मुंबईत मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ, लाईफलाईन ठप्प, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी
Bollywood Actress : हो...मी दारू पित होती, पण कोणी त्याचे कारण विचारलं का? टॉक शोमध्ये अभिनेत्रीने केले होते धक्कादायक गौप्यस्फोट...
हो...मी दारू पित होती, पण कोणी त्याचे कारण विचारलं का? टॉक शोमध्ये अभिनेत्रीने केले होते धक्कादायक गौप्यस्फोट...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raigad Heavy Rain : रायगडमध्ये ढगफुटी, महादरवाजातून पाण्याचं रौद्र रूप शिवभक्त थोड्यात बचावलेChembur Sindhi Colony चेंबुरच्या सिंधी कॉलनीत पाणी साचलं, मुसळधार पावसाने नागरिकांचे हालWestern Railway platform Crowd : पश्चिम रेल्वे स्टेशनांवर मोठी गर्दी, मुसळधार पावसाचा फटकाMumbai Rain Kurla Local Railway : कुर्ल्यात लोकल ट्रॅकवरही पाणी अजूनही कायम, पाण्यातून रेल्वे वाहतूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Rain Updates: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील तीन-चार तास मुसळधार पावसाचा इशारा, दीड वाजता समुद्रात मोठी भरती
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील तीन-चार तास मुसळधार पावसाचा इशारा, दीड वाजता समुद्रात मोठी भरती
Actresses Who Married Businessman : कोणी 7200 कोटी, कोणी 4000 कोटींचा मालक; 'या' बॉलिवूड अभिनेत्रींचे पती आहेत खूपच श्रीमंत
कोणी 7200 कोटी, कोणी 4000 कोटींचा मालक; 'या' बॉलिवूड अभिनेत्रींचे पती आहेत खूपच श्रीमंत
Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ, लाईफलाईन ठप्प, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी
मुंबईत मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ, लाईफलाईन ठप्प, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी
Bollywood Actress : हो...मी दारू पित होती, पण कोणी त्याचे कारण विचारलं का? टॉक शोमध्ये अभिनेत्रीने केले होते धक्कादायक गौप्यस्फोट...
हो...मी दारू पित होती, पण कोणी त्याचे कारण विचारलं का? टॉक शोमध्ये अभिनेत्रीने केले होते धक्कादायक गौप्यस्फोट...
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
Horoscope Today 08 July 2024 : आज आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Embed widget