एक्स्प्लोर

Petrol-Diesel Price : गाडीची टाकी फुल्ल करण्याचा विचार करताय? थांबा, आधी आजचे नवे दर जाणून घ्या

Petrol-Diesel Price Today 27 May 2022 : भारतीय तेल कंपन्यांकडून आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात आले असून आज देशातील दर स्थिर आहेत.

Petrol-Diesel Price Today 27 May 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) जारी केले आहेत. आज देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात घट करत सर्वसामान्यांना काहीसा दिलासा दिला होता. तेव्हापासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज सलग पाचव्या दिवशी देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

21 मे रोजी केंद्र सरकारनं पेट्रोलवरील 8 रुपये आणि डिझेलवरील 6 रुपयांचं उत्पादन शुल्क हटवलं होतं. त्यानंतर देशात पेट्रोल 9.50 रुपये आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झालं होतं. 

देशातील महानगरांत पेट्रोल-डिझेलचा दर काय? 

देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये तर डिझेलचा दर 97.28 रुपये प्रतिलिटर आहे. तर राजधानी असलेल्या दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि 1 लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोलची किंमत 106.03 रुपये आहे तर डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांतील दर काय? 

महाराष्ट्रातील मुंबई शहरात गुरुवारी पेट्रोलचा दर 111.35 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 97.28 रुपये प्रति लिटर आहे. तसेच, बृहन्मुंबईमध्ये, पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.53 रुपये आणि डिझेलचा दर 97.45 रुपये प्रति लिटर आहे. आज पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.93 रुपये तर डिझेलचा दर 96.38 रुपये प्रति लिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.25 रुपये तर डिझेलचा दर 95.73 रुपये प्रति लिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.41 रुपये तर डिझेलचा दर 95.92 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.02 रुपये तर डिझेलचा दर 95.54 रुपये प्रति लिटर आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ग्लेन मॅक्सवेल आजही बाहेरच, आरसीबीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
ग्लेन मॅक्सवेल आजही बाहेरच, आरसीबीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
Fact Check : मनमोहन सिंग यांनी 'देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क' असे विधान केले होते का? सत्य जाणून घ्या
मनमोहन सिंग यांनी 'देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क' असं म्हटलं होतं का? सत्य काय?
''आम्ही काही साधू-संत नाही, तुम्ही द्या, आमच्याकडून घ्या, आणि वाजवून घ्या''; अजित पवारांचा वेगळाच स्वॅग
''आम्ही काही साधू-संत नाही, तुम्ही द्या, आमच्याकडून घ्या, आणि वाजवून घ्या''; अजित पवारांचा वेगळाच स्वॅग
रक्षा खडसे, स्मिता वाघ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; जळगावात महायुतीकडून मोठं शक्तीप्रदर्शन
रक्षा खडसे, स्मिता वाघ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; जळगावात महायुतीकडून मोठं शक्तीप्रदर्शन
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Hello Mic Testing ABP Majha : हॅलो माईक टेस्टिंगमध्ये नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप आणि नेत्यांची भाषणंLok Sabha 2024 : महायुतीच्या उमेदवारांनी भरले उमेदवारी अर्ज, महायुतीचं जोरदार शक्तिप्रदर्शनVare Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे 5 PM : 25 April 2024Sangli : Chandrahar Patil यांनी घेतली काँग्रेस नेत्यांची भेट, Nana Patole यांच्याकडून स्वागत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ग्लेन मॅक्सवेल आजही बाहेरच, आरसीबीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
ग्लेन मॅक्सवेल आजही बाहेरच, आरसीबीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
Fact Check : मनमोहन सिंग यांनी 'देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क' असे विधान केले होते का? सत्य जाणून घ्या
मनमोहन सिंग यांनी 'देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क' असं म्हटलं होतं का? सत्य काय?
''आम्ही काही साधू-संत नाही, तुम्ही द्या, आमच्याकडून घ्या, आणि वाजवून घ्या''; अजित पवारांचा वेगळाच स्वॅग
''आम्ही काही साधू-संत नाही, तुम्ही द्या, आमच्याकडून घ्या, आणि वाजवून घ्या''; अजित पवारांचा वेगळाच स्वॅग
रक्षा खडसे, स्मिता वाघ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; जळगावात महायुतीकडून मोठं शक्तीप्रदर्शन
रक्षा खडसे, स्मिता वाघ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; जळगावात महायुतीकडून मोठं शक्तीप्रदर्शन
Vidya Balan : मी धार्मिक आहे पण कधीही....; देशातील धार्मिक ध्रुवीकरणावर विद्या बालनने काय म्हटले?
मी धार्मिक आहे पण कधीही....; देशातील धार्मिक ध्रुवीकरणावर विद्या बालनने काय म्हटले?
Mallikarjun Kharge on PM Modi : भाषणे पाहून आश्चर्य वाटलं नाही, जातीय तेढ निर्माण करणे तुमची सवय; मल्लिकार्जु खरगेंकडून खोचक शब्दात पीएम मोदींना पत्र
भाषणे पाहून आश्चर्य वाटलं नाही, जातीय तेढ निर्माण करणे तुमची सवय; मल्लिकार्जुन खरगेंचं खोचक शब्दात मोदींना पत्र
माजी क्रिकेटपटूवर बिबट्या काळ बनून आला, पण पाळीव कुत्रा देवासारखा धावून आला!
माजी क्रिकेटपटूवर बिबट्या काळ बनून आला, पण पाळीव कुत्रा देवासारखा धावून आला!
Mrunal Thakur On Freezing Eggs :  मृणाल ठाकूरने प्रेग्नेंसीबाबत घेतला मोठा निर्णय,  म्हणाली, योग्य जोडीदार मिळणं कठीण...
मृणाल ठाकूरने प्रेग्नेंसीबाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाली, योग्य जोडीदार मिळणं कठीण...
Embed widget