Uttarakhand Election: उत्तराखंडसाठी केजरीवालांचा वचननामा! शहीद जवानांच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची घोषणा
उत्तराखंडमधील (Uttarakhand ) सैनिक, निमलष्करी दलाचा जवान शहीद झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपये, तर निवृत्तीनंतर जवानांना सरकरमध्ये नोकरी देण्याची घोषणा अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) यांनी केली
Uttarakhand Assembly Election 2022 : आगामी उत्तराखंड विधानसभा निडणुकीच्या (Uttarakhand Assembly Election) तोंडावर सर्वच पक्ष मतदारांना आकर्षीत करण्यासाठी वेगगेळ्या योजनांच्या घोषणा करत आहेत. आता दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) यांनी उत्तराखंडमधील (Uttarakhand ) मतदारांना आकर्षीत करण्यासाठी एक घोषणा केली आहे. आम आदमी पक्षाचे सरकार उत्तराखंडध्ये आले तर तेथील कोणताही सैनिक आणि निमलष्करी दलाचा जवान शहीद झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना सन्मानाची रक्कम म्हणून 1 कोटी रुपये देण्यासह निवृत्तीनंतर जवानांना उत्तराखंड सरकरमध्ये थेट नोकरी देण्याची घोषणा केली.
अरविंद केजरीवाल यांनी आज डेहराढूनमध्ये आयोजित सभेत अनेक घोषणा केल्या. यावेळी केजरीवाल म्हणाले, "आम आदमी पक्षाचे सरकार उत्तराखंडमध्ये स्थापन झाल्यास, निवृत्त होणारे जवान उत्तराखंडच्या नवनिर्माणाचे भागीदार बनतील आणि त्यांना उत्तराखंड सरकारमध्ये थेट नोकऱ्या दिल्या जातील. सैनिकांचा सन्मान करण्याचे काम आम आदमी पक्ष करेल," असे आश्वासन अरविंद केजरीवाल यांनी यावेळी उत्तराखंडच्या जनतेला दिले.
दिल्लीतील जनतेला 24 तास मोफत वीज
पुढे बोलताना केजरीवाल म्हणाले की, दिल्लीतील लोकांना 24 तास मोफत वीज मिळते. जवळपास 35 लाख कुटुंबांचे वीज बिल शून्य रूपये येते. दिल्लीत राबवलेल्या योजना उत्तराखंडमध्ये राबवल्या तर दिल्लीसारखा उत्तराखंडचाही विकास होईल. येथील जनसान्यांसाठी आमचा प्रत्येक नेता काम करेल."
मुख्यमंत्र्यांवर निशाणा
अरविंद केजरीवाल यांनी यावेळी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. "मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना एका महिन्यात 5 हजार युनिट मोफत वीज मिळते. शिवाय येथील प्रत्येक मंत्र्यांना महिन्याला 4 हजार युनिट मोफत वीज मिळते. परंतु, मी जनतेला 300 युनिट मोफत वीज दिली तर त्यांना थंडी वाजते, असे म्हणत अरविंद केरजीवाल यांनी मुख्यनंत्र्यांवर जोरदार टीका केली.
महत्वाच्या बातम्या