एक्स्प्लोर

भाजप, आरएसएस आणि विहिंप दहशतवाद्यांच्या रडारवर

नवी दिल्ली : आयसिस या दहशतवादी संघटनेकडून भारतातील परदेशी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला केला जाण्याची शक्यता आहे. एनआयएमधील सुत्रांच्या माहितीनुसार नुकत्याच पकडलेल्या एका आयसिस संशयिताने या गोष्टीचा खुलासा केला आहे. तर दुसरीकडे अमेरिकेच्या दुतावासानेही पर्यटकांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. काय आहे आयसिस संशयिताचा खुलासा? आयसिस संशयिताच्या माहितीला भारतीय तपास संस्थांनी देखील दुजोरा दिला आहे. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, इस्रायल या देशातील पर्यटक आयसिसचे लक्ष्य आहेत, अशी माहिती पकडण्यात आलेल्या मोहम्मद मसीउद्दीन उर्फ मूसा या संशयिताने दिली आहे. दहशतवाद्यांनी कोलकात्याच्या मदर तेरेसा हाऊसचीही रेकी केल्याची माहिती मूसा या आयसिस संशयिताने दिली. तेथील पर्यटकांवर चाकूने हल्ला करण्याची योजना होती, असा खुलासा मूसा याने केला. नुकतेच तीन आयसिस संशयितांना पकडण्यात आले आहे. आरएसएस, भाजप आणि विहिंप दहशतवाद्यांच्या रडारवर भारतातील आयसिसचा प्रमुख शफी अरमार उर्फ युसूफ अल हिंदी भारतातील काही नेत्यांवर हल्ला करण्याचं नियोजन करत असल्याचा खुलासाही करण्यात आला आहे. युसूफ हा सीरियात बसून आयसिस समर्थकांना हल्ला करण्यासाठी तयार करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांवर हल्ला करण्याचे निर्देश युसूफने दिले असल्याचा खुलासाही मूसा याने केला. युसूफ हे सर्व निर्देश ऑनलाईन देत असल्याचीही माहिती मूसा या आयसिस संशयिताने दिली. ... अन्यथा भाजप, आरएसएस, विहिंपवर हल्ला करा : युसूफ पर्यटकांवर हल्ला करणं शक्य नसेल तर भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करा, असे निर्देशही युसूफने दिले आहेत. युसूफच्या ऑनलाईन चॅटिंगमधून हा खुलासा झाला आहे. युसूफ अल हिंदी उर्फ शफी अरमार सध्या सीरियामध्ये राहतो. तेथूनच भारतात आयसिसचे जाळे तयार करण्याचे काम युसूफकडून केले जाते. युसूफ भारतातील आयसिस समर्थकांशी टेलीग्राम या सोशल साईटवर 'Wind of Victory' या ग्रुपवरुन संपर्कात होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बिहारमधील मतदार छाननीची SIR प्रक्रिया देशभर लागू होणार, निवडणूक आयोगाने घेतला आढावा
बिहारमधील मतदार छाननीची SIR प्रक्रिया देशभर लागू होणार, निवडणूक आयोगाने घेतला आढावा
Nepal Protest : नेपाळमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सुशीला कार्की आघाडीवर, Gen Z आंदोलकांची पसंत माजी सरन्यायाधीश
नेपाळमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सुशीला कार्की आघाडीवर, Gen Z आंदोलकांची पसंत माजी सरन्यायाधीश
Supreme Court : आम्हाला आमच्या संविधानाचा अभिमान, शेजारच्या देशात काय होतंय पाहा, सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी दरम्यान नेमकं काय म्हटलं?
आम्हाला आपल्या संविधानाचा अभिमान, शेजारच्या देशात काय होतंय पाहा : सुप्रीम कोर्ट
Chandrashekhar Bawankule : ओबीसींवर अन्याय होणार नाही, खोट्या नोंदी नकोच; ओबीसी उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
ओबीसींवर अन्याय होणार नाही, खोट्या नोंदी नकोच; ओबीसी उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बिहारमधील मतदार छाननीची SIR प्रक्रिया देशभर लागू होणार, निवडणूक आयोगाने घेतला आढावा
बिहारमधील मतदार छाननीची SIR प्रक्रिया देशभर लागू होणार, निवडणूक आयोगाने घेतला आढावा
Nepal Protest : नेपाळमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सुशीला कार्की आघाडीवर, Gen Z आंदोलकांची पसंत माजी सरन्यायाधीश
नेपाळमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सुशीला कार्की आघाडीवर, Gen Z आंदोलकांची पसंत माजी सरन्यायाधीश
Supreme Court : आम्हाला आमच्या संविधानाचा अभिमान, शेजारच्या देशात काय होतंय पाहा, सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी दरम्यान नेमकं काय म्हटलं?
आम्हाला आपल्या संविधानाचा अभिमान, शेजारच्या देशात काय होतंय पाहा : सुप्रीम कोर्ट
Chandrashekhar Bawankule : ओबीसींवर अन्याय होणार नाही, खोट्या नोंदी नकोच; ओबीसी उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
ओबीसींवर अन्याय होणार नाही, खोट्या नोंदी नकोच; ओबीसी उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
हायवाच्या धडकेत बुलेटस्वार सरपंच ठार, दवाखान्यात घेऊन गेलेल्या चिमुकल्या नातीचाही मृत्यू; आजी गंभीर जखमी
हायवाच्या धडकेत बुलेटस्वार सरपंच ठार, दवाखान्यात घेऊन गेलेल्या चिमुकल्या नातीचाही मृत्यू; आजी गंभीर जखमी
पुणे साखळी बॉम्बस्फोटातील आरोपीला हायकोर्टाकडून जामीन; 12 वर्षानंतर तुरुंगाबाहेर येणार फारुख बागवान
पुणे साखळी बॉम्बस्फोटातील आरोपीला हायकोर्टाकडून जामीन; 12 वर्षानंतर तुरुंगाबाहेर येणार फारुख बागवान
10 दिवसांपूर्वीच वास्तुशांती, नवं अलिशान घरं ठरलं कारण? नर्तिका-उपसरपंच प्रेमप्रकरणाची 'डिमांड स्टोरी'
10 दिवसांपूर्वीच वास्तुशांती, नवं अलिशान घरं ठरलं कारण? नर्तिका-उपसरपंच प्रेमप्रकरणाची 'डिमांड स्टोरी'
Mutual Fund : इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ऑगस्ट महिन्यात घटली, आकडेवारी समोर, गुंतवणूक तब्बल 22 टक्क्यांनी घसरली
इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत घसरण, ऑगस्ट महिन्यात गुंतवणूक 22 टक्क्यांनी घटली
Embed widget