एक्स्प्लोर
अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दहशतवादावरुन पाकिस्तानला खडसावलं!
नवी दिल्ली: उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला चांगलंच फैलावर घेतलं आहे. पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घालणे बंद करावे, अशा शब्दात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी पाकिस्तानला खडसावलं आहे.
उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरिफ यांनी काश्मीर प्रश्नी अमेरिकेने मध्यस्थी करून तोडगा काढावा, अशी विनंती केली होती. याच्या काही तासातच केरी यांची प्रतिक्रीया आली आहे. अमेरिकेने उरीमधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
तर दुसरीकडे उरी हल्ल्यानंतर भारताने दबाव वाढवल्यानंतर चीन आणि पाकिस्तानमधील मिलीभगत समोर आली आहे. पाकिस्तानविरोधात कारवाई करताना संपूर्ण विचार करुन करा, असा इशारा चीनने भारताला दिला आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनची एकूण 46 अब्ज रुपयांची गुंतवणूक आहे. त्यामुळे भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोणतीही कारवाई केल्यास त्याचा सरळ फटका चीनला बसणार आहे.
त्याचवेळी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटं पाडण्याची भारताची मोहीम यशस्वी होताना दिसते आहे. कारण रशियाने पाकिस्तानसोबतचा MI-35 हेलिकॉप्टर देण्याचा करार रद्द केला आहे. शिवाय, पाकव्याप्त काश्मीरमधील एकत्रित युद्ध सरावही होणार नाही.
संबंधित बातम्या
भारतीय लष्कर सक्षम, आता वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवू: लेफ्टनंट जनरल
पाकविरोधात विचार करुन करावाई करा, चीनचा भारताला इशारा
पाकला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटं पाडण्याच्या भारताच्या मोहिमेला पहिलं यश!
दहशतवादी हल्ल्याला चोख उत्तर देण्यासाठी राजकीय हालचालींना वेग
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement