'मुलींना मोबाइल देऊ नका, फोनवर बोलतात अन् मुलांबरोबर पळून जातात' युपी महिला आयोगाच्या सदस्याचे वादग्रस्त विधान
उत्तर प्रदेशच्या राज्य महिला आयोगाच्या सदस्या मीना कुमारी म्हणाल्या की, मुलींना मोबाइल देऊ नये. मुली मोबाईलवर तासनतास बोलतात आणि मुलांसोबत पळून जातात.

लखनौ : उत्तर प्रदेशातील राज्य महिला आयोगाच्या सदस्या मीना कुमारी यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. मीना कुमारी यांचे हे वक्तव्य मुलींशी संबंधित असून यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. मुली मोबाइलवर तासनतास बोलत असतात, त्यामुळे मुलींना मोबाइल देऊ नये, असे विधान मीना कुमारी यांनी केलंय. त्यांनी असेही म्हटले आहे की जर मुली बिघडल्या तर त्यासाठी त्यांची आई पूर्णपणे जबाबदार आहे.
मीना कुमारी काही कार्यक्रमानिमित्त बुधवारी अलिगड येथे गेल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मीना कुमारी म्हणाल्या, की "समाजातील महिलांवरील वाढत्या गुन्हेगारीबद्दल स्वतः समाज गंभीर असला पाहिजे. अशा प्रकरणांमध्ये मोबाईल एक मोठी समस्या बनली आहे. मुली मोबाईलवर तासनतास बोलत असतात. मुलांसोबत फिरत असतात. त्यांचे मोबाइल तपासले जात नाहीत, कुटुंबियांना याची माहिती नसते. आणि मग मोबाईलवर बोलता बोलताच त्या मुलांबरोबर पळून जातात.
आवाहन करताना ते म्हणाले की मुलींना मोबाईल देऊ नका आणि जर तुम्ही मोबाईल दिले तर त्यांचे पूर्ण निरीक्षण करा. ते म्हणाले की मातांवर मोठी जबाबदारी असते. जर आज मुलींचा नाश झाला तर त्यासाठी आईच जबाबदार आहेत.
यावेळी त्यांनी आवाहन केले की मुलींना मोबाईल देऊ नका आणि जर तुम्ही मोबाईल दिले तर मुंलींवर लक्ष ठेवा. त्या म्हणाल्या की आईवर मोठी जबाबदारी असते. जर आज मुली वाईट मार्गाला जात असेल तर त्यासाठी आईच जबाबदार असते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
