एक्स्प्लोर
...म्हणून मंत्र्यांकडूनच बस स्थानकावरील सार्वजनिक शौचालयाची सफाई
उत्तरप्रदेशच्या परिवहन मंत्र्यांनीच चक्क शौचालयाची सफाई केली. स्वच्छतेसाठी मंत्री महोदयांनीच हातात फिनाईल घेऊन शौचालयाची स्वच्छता केल्याने सर्वच जण चक्रावले.

लखनऊ : उत्तरप्रदेशच्या परिवहन मंत्र्यांनीच चक्क शौचालयाची सफाई केली. स्वच्छतेसाठी मंत्री महोदयांनीच हातात फिनाईल घेऊन शौचालयाची स्वच्छता केल्याने सर्वच जण चक्रावले. बस स्टँडची पाहणी करण्यासाठी यूपीचे परिवहन मंत्री स्वतंत्र देव सिंह मिर्झापूरच्या एका बस स्टँडवर पोहोचले होते. पण तिथल्या शौचालयाची अवस्था इतकी खराब होती की स्वतः मंत्रीच चकीत झाले. यानंतर स्वतंत्र सिंह यांनी स्वत फिनाईलनं शौचालयाची स्वच्छता करायला घेतली. त्यांच्यासोबत आलेले आमदार रमाशंकर सिंह यांनीदेखील स्वच्छता करण्यास हातभार लावला. दरम्यान, मंत्री महोदयांच्या या कृतीने यावेळी तिथे उपस्थित असलेले सर्वच जण चक्राऊन गेले. तसेच, यापुढे अशी अस्वच्छता चालणार नाही अशी, ताकीदही सिंह यांनी अधिकाऱ्यांना दिली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रीडा
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग























