एक्स्प्लोर
'यूपी'त स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच 60 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान

लखनऊ : विधानसभा निवडणुकीचं सातव्या टप्प्यातील मतदान पार पडताच उत्तर प्रदेशने मतदानाचा विक्रम नोंदवला आहे. उत्तर प्रदेशच्या इतिहासात पहिल्यांदाच एकूण सात टप्प्यात 61.03 टक्के मतदान झालं आहे. देशाचं लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशात सात टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडली. अखेरच्या आणि सातव्या टप्प्यात 60 टक्के मतदान झालं. अजून एका जागेवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे हा आकडा आणखी वाढू शकतो. गेल्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात 59.40 टक्के मतदान झालं होतं. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक ही 2019 च्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल मानली जाते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांनी या निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मतदानाची टप्पानिहाय आकडेवारी
- पहिला टप्पा - 64.02 टक्के
- दुसरा टप्पा - 66.05 टक्के
- तिसरा टप्पा - 61.16 टक्के
- चौथा टप्पा - 61 टक्के
- पाचवा टप्पा - 57.04 टक्के
- सहावा टप्पा - 57.03 टक्के
- सातवा टप्पा - 60.03 टक्के
- एकूण - 61.03 टक्के
संबंधित बातम्या :
...म्हणून पंतप्रधान मोदींचा तीन दिवस वाराणसीत मुक्काम : अमित शाह
उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या!
आणखी वाचा























