Viral Video : यूपीमध्ये शिक्षिकेने विद्यार्थ्याला इतर मुलांकडून मारहाण केली, धर्मावरही टिप्पणी केली; व्हायरल व्हिडीओनंतर राहुल गांधींची भाजपवर टीका
Muzaffarnagar Teacher Video: यूपीतील एका विद्यार्थ्याला इतर विद्यार्थी मारतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून बाजूला बसलेल्या शिक्षिकेनेच तसं करण्यास सांगितलं होतं.
लखनौ: उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये शाळेतील शिक्षकेने एका विद्यार्थ्याला पाचचा पाढा न आल्याने शिक्षा म्हणून वर्गातील इतर विद्यार्थ्यांना मारण्यास सांगितलं. तसेच त्या विद्यार्थ्याच्या धर्मावरूनही टीका केली. या संबंधिचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता त्यावर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. शाळेसारख्या पवित्र ठिकाणी लहान मुलांच्या मनामध्ये भेदभावाच्या भिंती उभ्या केल्या जात आहेत, भाजपने जे तिरस्काराचे केरोसिन पसरवलं आहे ते आता देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचल्याची टीका काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केली.
काय आहे नेमकं प्रकरण?
यूपीतील मुझफ्फरनगरमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका विद्यार्थ्याला पाचचा पाढा न आल्याने त्याला शिक्षा म्हणून शिक्षिकेने इतर मुलांना मारण्यास सांगितलं. त्यावर वर्गातील एक एक मुलगा त्या विद्यार्थ्याला मारताना दिसतोय. एवढंच नाही तर बाजूला बसलेल्या शिक्षिकेने त्या विद्यार्थ्याच्या धर्मावरही भाष्य केलं. त्या ठिकाणी बसलेल्या दुसऱ्या एका शिक्षकाने हा व्हिडीओ शूट केला आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता त्या शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानेही याची दखल घेतली आहे.
राहुल गांधींची टीका
यूपीतील व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, शाळेसारख्या पवित्र ठिकाणी लहान मुलांच्या मनामध्ये भेदभावाच्या भिंती उभा करण्याचं एका शिक्षिकेने करणे यापेक्षा वाईट काय असून शकेल. भापजने पसरवलेले हे केरोसिन आहे, ज्यामुळे देशातल्या कानाकोपऱ्यात आग लागली आहे. लहान मुलं ही भारताचे भविष्य आहेत, त्यांना तिरस्कार नव्हे तर प्रेमाची शिकवण देणं आवश्यक आहे.
मासूम बच्चों के मन में भेदभाव का ज़हर घोलना, स्कूल जैसे पवित्र स्थान को नफ़रत का बाज़ार बनाना - एक शिक्षक देश के लिए इससे बुरा कुछ नहीं कर सकता।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 25, 2023
ये भाजपा का फैलाया वही केरोसिन है जिसने भारत के कोने-कोने में आग लगा रखी है।
बच्चे भारत का भविष्य हैं - उनको नफ़रत नहीं, हम सबको मिल…
मुलाच्या वडिलांनी मुलाला शाळेतून काढले
या घटनेनंतर मुलाच्या वडिलांनी त्याला शाळेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मुलाच्या वडिलांचा एक व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये ते म्हणतात की, "शिक्षकाने मुलांमध्ये वाद निर्माण केला होता. आम्ही तोडगा काढला आहे. मला शिक्षकाविरुद्ध पोलिस तक्रार करायची नाही. आम्ही या शाळेतून मुलाचं नाव कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मला या सगळ्यात पडायचे नाही."
असदुद्दीन ओवेसी काय म्हणाले?
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मुलाला मारहाणीचा व्हिडीओ शेअर करताना यूपीच्या योगी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणतात की, "हा व्हिडीओ उत्तर प्रदेशचा आहे. शिक्षक एका मुलाला वर्गातील बाकीच्या मुलांना मारहाण करण्यास सांगत आहेत."
ही बातमी वाचा: