एक्स्प्लोर
Advertisement
सेन्सेक्स-निफ्टीचा उच्चांक, गुंतवणूकदारांना दीड लाख कोटींचा फायदा
नवी दिल्ली: उत्तरप्रदेशसह चार राज्यात भाजपला मिळालेल्या यशानं शेअर बाजारातील गुंतवणूकदाराना चांगलाच फायदा झाला आहे. एकट्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या गुंतवणुकीची किंमत म्हणजेच मार्केट कॅपिटलायझेशन रुपयांहून अधिक वाढली आहे.तर यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाही मजबूत झाला आहे.
निवडणूक निकालानंतर पहिल्यांदा मंगळवारी जेव्हा शेअर बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही वेगानं सुरु झाले. 30 शेअर असणारं सेन्सेक्स 500 अकांनी वर होता तर निफ्टी सुरु झाल्यानंतर 9122 अकांपर्यंत पोहचला. सेन्सेक्सनं दोन वर्षामधील उच्चांक नोंदवला. 29443 वर आज बाजार बंद झाला. शुक्रवारपेक्षा 500 अकांनी जास्त आहे. तर दुसरीकडे निफ्टी आज पहिल्यांदा 9000च्या वर बंद झाला.
बाजार तसं आज बरंच उत्साहाचं वातावरण होतं. खासकरुन बँकिंग शेअरमध्ये बराच उत्साह होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी घोषणा केली होती की, उत्तरप्रदेशच्या नव्या सरकारच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर निर्णय होईल. त्यामुळे सरकारकडून बँकांना पैसे मिळण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे बँकांचे शेअर मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आले.
आज ज्या 3045 कंपन्यांचे शेअर खरेदी झाले त्यामध्ये गुंतवणुकीची किंमत 1 कोटी 17लाखाहून 1 कोटी 18 लाखांपर्यंत पोहचला. म्हणजेच एका दिवसात गुंतवणूकदारांना एक लाख 55 हजार कोटी रुपयांहून अधिक फायदा झाला.
बाजारात आशा आहे की, निवडणूक निकालानंतर आर्थिक सुधारणेला बराच वाव मिळेल. दरम्यान, आता रिझर्व्ह बँकेच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. या बैठकीत व्याज दर वाढवण्यावर निर्णय होऊ शकतो. जर असं झालं तर अमेरिकी शेअर बाजारात जास्त कमाई होण्याचे संकेत दिसल्यास परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून पैसे काढू शकतात. त्यामुळे शेअर बाजारात थोडा फरक पडू शकतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement