UP Election 2022: अदिती सिंह आणि वंदना सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश
UP Election 2022 : भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
UP Election 2022 : उत्तर प्रदेशच्या काँग्रेस आमदार अदिती सिंहने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अदिती सिंह रायबरेली जिल्ह्यातील गढ मतदारसंघाच्या आमदार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दोन्ही नेत्यांच्या भाजप प्रवेशानंतर प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र सिंह म्हणाले, दोन लोकप्रिय नेत्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आदिती सिंह आणि वंदना सिंह या दलितांसाठी काम करतात.
आदिती सिंह या 2017 साली कॉंग्रेसच्या तिकिटावर यूपी विधानसभा निवडणूक लढवली होती, रायबरेली मतदार संघातून त्या निवडुण आल्या होत्या. गेल्या दीड वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणावर सातत्याने टीका करत होत्या. तर अनेक जाहीर कार्यक्रमात त्यांनी प्रियंका गांधी यांच्यावर देखील टीका केली. आदिती सिंह यांनी 2017 साली विधानसभा निवडणुकीत एक लाखाच्या मताधिक्याने जिंकल्या आहेत.
आदिती सिंह आणि राहुल गांधी यांच्या लग्नाच्या अफवा इतक्या पसरल्या होत्या की नंतर आदिती यांना त्याबाबत स्पष्टीकरण द्यायची वेळ आली होती. 2019 मध्ये त्यांचा विवाह पंजाब मध्ये काँग्रेस आमदार असलेले अंगद सिंह सैनी यांच्यासोबत झाला. आज भाजपचे उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्या उपस्थितीत अखेर भाजप प्रवेश आदिती सिंह यांचे पती अजूनही काँग्रेसमध्येच आहेत त्यांना आता पंजाब मध्ये तिकीट मिळतं का याचीही उत्सुकता असेल.
राहुल गांधींसोबत आदिती सिंह यांच्या लग्नाची अफवा एकेकाळी सुरू होती
तर वंदना सिंह यांनी आजमगढची जागा बसपाच्या तिकिटावर जिंकली होती. वंदना सिंह यांनी समाजवादी पक्षाच्या जयराम पाटील यांचा पराभव केला होता. वंदना सिंह यांचे पती सर्वेश सिंह उर्फ सिपू यांनी 2007 साली समाजवादीच्या तिकिटाव निवडणूक लढवली होती. बसपाचे मलिक मसूद यांचा पराभव करत ते आमदार म्हणून निवडून आले होते. 2012 साली विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या दुर्गा प्रसाद यांनी पराभव केला. या अगोदर बसपाचे सहा मंत्री समाजवादी पक्षामध्ये गेले होते.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या :