Nitin Gadkari Corona Positive: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचं आवाहन
कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी स्वत:ला होम क्वॉरंटाईन केलं असल्याची माहिती दिली आहे.
मुंबई : देशातील आणि राज्यातील अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आता या यादीत आणखी एका नावाची भर पडली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. नितीन गडकरी यांनी स्वत: ही माहिती दिली असून आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करावी आणि स्वत:ला आयसोलेट करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. नितीन गडकरी म्हणाले, "सौम्य लक्षणासह मला कोरोनाची लागण झाली आहे. त्यासंबंधी सर्व नियमांचे पालन करुन मी स्वत:ला होम क्वॉरंटाईन केलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी कोरोनाची चाचणी करावी आणि स्वत: आयसोलेट व्हावं."
कोरोनाची लागण झालेले राजकीय नेते
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे
माजी मंत्री पंकजा मुंडे
मंत्री एकनाथ शिंदे
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
आदिवासी मंत्री के. सी. पाडवी
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर
खासदार सुप्रिया सुळे
आमदार सागर मेघे
आमदार राधाकृष्ण विखे पाटील
आमदार शेखर निकम
आमदार गिरीश महाजन
आमदार इंद्रनील नाईक
आमदार चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर)
आमदार माधुरी मिसाळ
माजी मंत्री दिपक सावंत
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
आमदार रोहित पवार
आमदार धीरज देशमुख
महत्त्वाच्या बातम्या :
- Maharashtra Corona Update : राज्यात मंगळवारी 34,424 रुग्णांची नोंद, तर 22 जणांचा मृत्यू
- Corona Testing Kit : मुंबई महापालिका कोरोना टेस्टिंग किट संदर्भात लवकरच नियमावली जारी करणार
- Neha Pendse Corona Positive: : अभिनेत्री नेहा पेंडसेला कोरोनाची लागण, तीन वेळा केली होती चाचणी