युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची अवस्था पाहून राहुल गांधी झाले भावूक, विद्यार्थ्यांसोबत मारहाणीचा व्हिडीओ केला शेअर
Ukraine-Russia War: रशिया आणि युक्रेन युद्धात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करावी, असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला केले आहे.
Ukraine-Russia War: रशिया आणि युक्रेन युद्धात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करावी, असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला केले आहे. राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ देखील ट्वीट केला आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांसोबत हिंसाचार आणि मारहाण होत असल्याचे दिसत आहे.
राहुल गांधी यांनी हा व्हिडीओ ट्वीट करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''अशा हिंसाचाराचा सामना करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि ज्यांनी हा व्हिडीओ पाहिला त्यांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या संवेदना. या प्रकारच्या हिंसाचाराचा सामना करणार्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी आणि ज्यांनी हा व्हिडीओ पाहिला आहे त्यांच्या कुटुंबियांसाठी दुःख होत आहे. कोणत्याही पालकांनी अशा परिस्थितीतून जाऊ नये. भारत सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्वरित बाहेर काढण्याची योजना शेअर करावी. आपण आपल्या प्रियजनांना सोडू शकत नाही.'', असं राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
याआधी राहुल गांधींनी युक्रेनमधील बंकरमध्ये अडकलेल्या कर्नाटकातील काही भारतीय विद्यार्थ्यांचा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी ट्विट केले की, “बंकरमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे हे दृश्य अस्वस्थ करणारे आहे. अनेक विद्यार्थी पूर्व युक्रेनमध्ये अडकले आहेत, जिथे भयानक हल्ले होत आहेत. मी या विद्यार्थ्यांच्या कुटुंबासोबत आहे. मी पुन्हा एकदा भारत सरकारला त्यांना त्वरित युक्रेनमधून बाहेर काढण्याचे आवाहन करतो.''
My heart goes out to the Indian students suffering such violence and their family watching these videos. No parent should go through this.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 28, 2022
GOI must urgently share the detailed evacuation plan with those stranded as well as their families.
We can’t abandon our own people. pic.twitter.com/MVzOPWIm8D
ऑपरेशन गंगा अंतर्गत 1156 भारतीय नागरिकांची घरवापसी
युद्धग्रस्त युक्रेनमधील भारतीयांच्या मायदेशी परत आणण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी अधिकृत ट्विटर हँडल 'ओपगंगा हेल्पलाइन' सुरू केली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत भारतात आणण्याच्या अभियानाला 'ऑपरेशन गंगा' असे नाव देण्यात आले आहे. सोमवारी सकाळी एअर इंडियाचे विमान AI 1942 सकाळी 6.30 वाजता रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून दिल्लीला पोहोचले. विमानात 249 भारतीय नागरिक होते. ऑपरेशन गंगा अंतर्गत तीन दिवसांतील हे पाचवे विमान होते जे बचाव कार्यसाठी पाठवण्यात आले होते. युक्रेनमधून तीन दिवसांत आतापर्यंत 1156 भारतीय सुखरूप परतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: